लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी निवडणूक आयोग रविवार, ७ जानेवारीपासून राज्यांचा दौरा सुरू करणार आहे. निवडणूक तयारी आणि मूलभूत आव्हानांचा आढावा घेण्यासाठी निवडणूक आयोगाच्या उपायुक्तांनी गेल्या दोन महिन्यांत जवळपास सर्व राज्यांना भेटी दिल्या आहेत. त्यामुळे आता ते मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, आयुक्त अनुप चंद्र पांडे आणि अरुण गोयल यांच्या दौऱ्यापूर्वी आपला अहवाल देताना त्यातील विविध पैलूंवर चर्चा करणार आहेत.
लोकसभा निवडणुकीसाठी राज्यांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी निवडणूक आयोग (EC) पुढील आठवड्यात आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूला भेट देणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, निवडणूक आयुक्त अनुप चंद्र पांडे आणि अरुण गोयल 7 ते 10 जानेवारी दरम्यान आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूला भेट देणार आहेत.