आयपीएलच्या १६व्या हंगामात कोरोनाचा शिरकाव

मुंबई : आयपीएलच्या १६व्या हंगामाला मोठ्या दिमाखात सुरुवात झाली आहे. मात्र या हंगामातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. माजी भारतीय खेळाडू, प्रसिद्ध समालोचक आणि क्रिकेट तज्ञ आकाश चोप्रा करोनाच्या विळख्यात आला आहे. स्वतः प्रसिद्ध समालोचकाने ही माहिती दिली. त्याने सर्वप्रथम आपल्या यूट्यूब चॅनेलच्या कम्युनिटी पोस्टद्वारे याचा खुलासा केला. आकाश चोप्राने सांगितले की, आता तो काही दिवस आयपीएल २०२३ मध्ये कॉमेंट्री करू शकणार नाही. त्याचबरोबर त्याने एक ट्विटही केले आहे.

आकाश आयपीएल २०२३ मध्ये जिओ सिनेमासाठी हिंदी कॉमेंट्री करत होता. आपली कम्युनिटी पोस्ट शेअर करताना, आकाश चोप्राने लिहिले, व्यत्ययाबद्दल क्षमस्व कोविडने पुन्हा एकदा तडाखा दिला आहे. काही दिवस कॉमेंट्री बॉक्समध्ये दिसणार नाही. येथे देखील सामग्री थोडी कमी असू शकते. घसा खवखवणे मग आवाजाची लोचा. बघा भावांनो वाईट वाटू घेऊ नका. लक्षणे सौम्य आहेत. देवाचे आभार.

याशिवाय या दिग्गजाने त्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवरूनही ही माहिती शेअर केली आहे. त्यानी ट्विटमध्ये लिहिले, होय (कोविड) विषाणूने पुन्हा हल्ला केला आहे. लक्षणे अतिशय सौम्य आहेत. सर्व काही नियंत्रणात आहे. काही दिवस कॉमेंट्री ड्युटीपासून दूर राहीन दमदार पुनरागमन करण्याची आशा.