जिंदालमधील आगीचं नेमकं कारण आलं समोर, सात जणांविरुद्ध गुन्हा

नाशिक : इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथे जिंदाल कंपनीमध्ये 1 जानेवारी रोजी लागलेल्या भीषण आगीचं नेमकं कारण समोर आलं आहे. दरम्यान, या घटनेत दोन महिलासंह एका कामगाराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. अखेर या घटनेचा चौकशी अहवाल समोर आला आहे.

अहवालात काय म्हटलंय?
या अहवालाच्या माध्यमातून हा प्लॅन्ट घटनेच्या दिवसांआधीपासून महिनाभर बंद होता. यातील ऑईलच्या गळतीमुळे आग लागल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान पोलिसांनी जिंदाल पॉली फिल्म प्रा. लि. कंपनीचे भोगवटादार संजीव सक्सेना, फॅक्टरी मॅनेजर विद्याधर नरहरी मधुआल, पॉली फिल्म प्लॅट बिजीनेस हेड पंकज दंदे, पॉली फिल्म प्लॅन्ट प्रोडक्शन मॅनेजर अनिल कुमार, मेन्टेनन्स विभाग प्रमुख रविंद्रकुमार सुरेंद्रकुमार सिग, गजेंद्रपाल नेत्रपाल सिंग, राकेश राजकिरण सिंह, या सात जणांना जबाबदार धरत त्यांच्याविरुद्ध सहायक पोलिस निरीक्षक दिलीप खेडकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.