पनवेल : पनवेलमधून एक धक्कादाक घटना समोर आली आहे. बारावीच्या विद्यार्थ्यानं परीक्षा सुरू होण्यापुर्वी जीवन संपविल्याची घटना घडली आहे. वंश नवनाथ म्हात्रे वय १७ असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. दरम्यान, वंश याने अभ्यासाला कंटाळून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पाेलिसांनी दिली.
बारावीची परीक्षेस आजपासून (मंगळवार २१ फेब्रुवारी) प्रारंभ झाला. या परीक्षेचा पहिला पेपर आज झाला. त्यास हजारो विद्यार्थी बसले हाेते. मात्र, परीक्षा सुरू होण्यापुर्वी पनवेल येथील वंश नवनाथ म्हात्रे याने अभ्यासाला कंटाळून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पाेलिसांनी दिली. वंश हा देवदर्शन सोसायटीत वास्तव्या हाेता. ताे इयत्ता बारावीत हाेता. आज त्याचा पहिला पेपर हाेता. आई वडील घरात नसताना त्याने आत्महत्या केल्याची माहिती सूत्रानुसार समोर आली आहे.
दरम्यान, विद्यार्थ्यांनी परिक्षेला घाबरुन जाऊ नये त्यास सामाेरे जावे. स्वत:च्या जीवापेक्षा परिक्षा महत्वाची नाही. त्यामुळे काही अडचण असल्यास पालकांशी संवाद साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक प्रमाेद पवार यांनी केले.