तरुण भारत लाईव्ह । जळगाव : उध्दव ठाकरे यांच्या हस्ते दिवंगत आर. ओ. पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले. यावेळी ठाकरे मंचावर असताना पुतळ्याच्या डाव्या बाजुस फुलांना आग लागली. पुतळ्याचे अनावरण करताच ही आग लागली.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना ठाकरे म्हणाले, “मविआ काळात शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झाली. जगणार कुणासाठी स्वतःसाठी कि, जनांसाठी. शेवटच्या क्षणांपर्यंत आर. ओ. पाटील यांनी शेतकऱ्यांसाठी कार्य केले. शेतकरी हे आर. ओ. पाटलांचे कुटुंब होते. पिकेल ते विकेल यावर जगभर संशोधन व्हावे. ”
“शेतकऱ्यांना हमी भाव मिळायलाच हवा यासाठी आपण काही प्रयत्न करू शकतो का. यासाठी लॅबचा वापर व्हावा. शेतकऱ्यांना सज्ञान करण्याची जबाबदारीही आपल्यावर आहे. शेतकऱ्यांचे आयुष्य समृद्ध करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया. ” असं ठाकरे यावेळी म्हणाले.