शाळेचा पहिला दिवस ठरला अविस्मरणीय!

तरुण भारत लाईव्ह न्युज जळगाव : दि. १५/६/२३ गुरुवार रोजी विवेकानंद प्रतिष्ठान संचलित, डॉ.अविनाश आचार्य विद्यालय, पूर्व प्राथमिक विभागाच्या शाळेत १५ जून शाळेच्या पहिल्या दिवसाची सुरुवात ही पारंपारिकरित्या संस्कृती जपत औक्षणाने करण्यात आली. नंतर मुलांची ओळख म्हणून मुलांनी स्वतःचे थम्ब प्रिंट उमटवले. शाळेचा पहिला दिवस अविस्मरणीय ठरला कारण लहान मुलांचे जगातले हे घराबाहेरचे पडलेले पहिले पाऊल असते असे असताना त्यांच्यासाठी सेल्फी पॉईंट ठेवण्यात आले होते.

 

 

सोबतच विविध इनडोअर, आउटडोअर चॅलेंजिंग असे खेळ देखील उपलब्ध करून दिले होते. सुमधुर संगीताच्या सानिध्यात सगळ्या मुलांनी आपल्या आई-बाबांसोबत येऊन आपल्या शाळेचा पहिला दिवस आनंदात घालवला. त्या आठवणी फोटोच्या स्वरूपात स्वतःबरोबर घेऊन गेले. पहिला दिवस साजरा करण्याची मूळ संकल्पना ही मुख्याध्यापिका कल्पना बावस्कर यांची असून ती प्रत्यक्षात आणण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.