तरुण भारत लाईव्ह ।१५ मार्च २०२३। वर्षातील पहिले ग्रहण 20 एप्रिल रोजी लागणार आहे. हे ग्रहण भारतात दिसणार नाही. वर्षातील पहिले ग्रहण मेष राशीत होणार आहे.या वर्षातील पहिले सूर्यग्रहण गुरुवार, २० एप्रिल रोजी होणार आहे. हे ग्रहण 20 एप्रिल रोजी सकाळी 7.04 ते दुपारी 12.29 या वेळेत होईल. ज्योतिषशास्त्रातही ग्रहणाला विशेष महत्त्व दिले गेले आहे. हे ग्रह काही राशीच्या व्यक्तींना अशुभ ठरू शकत. चला तर जाणून घेऊया कोणत्या राशींना सूर्यग्रहण अशुभ ठरणार आहे.
मेष रास
ग्रहणाच्या प्रभावामुळे मेष राशीच्या लोकांनी खूप सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. मेष राशीच्या लोकांना ग्रहणाच्या प्रभावामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागू शकते. सूर्यग्रहणाच्या काळात या राशीच्या लोकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. सूर्यग्रहणच्या काळात मेष राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये काही आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. या ग्रहणामुळे लोकांना त्यांच्या कर्माचे अशुभ फळ मिळेल. या राशीच्या राशीच्या लोकांनी केलेली कामेही खराब होऊ शकतात.
कर्क रास
कर्क राशीच्या व्यक्तींना हे सूर्यग्रहण अशुभ फळे देईल. काम वेळेवर पूर्ण होणार नाहीत. आर्थिक समस्येचा सामना करावा लागू शकतो. कुटुंबात वादविवाद होतील. या सूर्यग्रहणामुळे तुमचा मानसिक ताण वाढू शकतो. आरोग्य बिघडण्याची दाट शक्यता आहे.
कन्या रास
कन्या राशीच्या व्यक्तींना आर्थिक व्यवहार करताना खूप सावधगिरीने पावले उचलावी लागणार आहेत. व्यवसाय करणाऱ्या लोकांना नुकसान होऊ शकते. आरोग्य खराब होईल. मेहनतीला यश येणार नाही.