या वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण; ‘या’ राशींना होईल नुकसान

तरुण भारत लाईव्ह । २४ मार्च २०२३। चैत्र अमावस्येला या वर्षातील पहिलं सूर्यग्रहण लागणार आहे. 20 एप्रिल 2023 रोजी गुरुवारी मेष राशीत पहिलं सूर्यग्रहण असणार आहे. विशेष म्हणजे या राशीत आधीच राहु ग्रह विराजमान असल्याने विपरीत परिणाम दिसून येतील.  मेष राशीत सूर्य आणि राहुची युती आणि ग्रहण एकाच वेळी होणार आहे. 20 एप्रिलला सकाळी 7 वाजून 5 मिनिटांपासून दुपारी 12 वाजून 29 मिनिटांपर्यंत सूर्यग्रहण असणार आहे.  ज्योतिषशास्त्रानुसार काही राशींवर वाईट प्रभाव दिसून येईल कोणत्या राशींवर ग्रहणाचा विपरीत परिणाम होणार आहे हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

मेष – सूर्यग्रहण मेष राशीत असणार आहे. त्यामुळे या राशीवर सर्वाधिक परिणाम दिसून येईल. जातकांना मानसिक त्रास सहन करावा लागेल. त्यामुळे या काळात काळजी घेणं गरजेचं आहे. अपघाताची भीती असल्याने गाडी काळजीपूर्वक चालवा. शक्यतो लांबचा प्रवास टाळणं गरजेचं आहे.

कर्क – या राशीचा जातकांनाही ग्रहणाचा फटाक बसणार आहे. या काळात नाहक मानसिक त्रास सहन करावा लागेल. अचानक भीतीसारखं वाटेल आणि नकारात्मकता वाढेल. या काळात धीर धरा आणि दैवी उपासना करा.

वृश्चिक – या राशीच्या लोकांना या काळात अपमान सहन करावा लागेल. यासाठी वाणीवर नियंत्रण ठेवून काम करा. विचार करूनच एखाद्याला शब्द द्या. वादापासून लांब राहिलेलंच बरं असेल. खर्चात वाढ होईल.