थंडीचा जोर कमी होणार, पण या भागात पावसाची शक्यता

पुणे : थंडीमुळे अनेक राज्यात जनजीवन विस्कळीत झालं आहे. अशातच हवामान विभागाने एक दिलासादायक बातमी दिली आहे. पुढच्या २४ तासाचा थंडीचा रोज कमी होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवली आहे. दिल्ली आणि आसपासच्या भागात तापमान २ ते ३ अंशांनी वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मात्र, त्यानंतर काही भागात पावसाची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे.

२२ आणि २३ जानेवारीला पंजाबच्या काही भागात हलका पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आहे. २४ आणि २५ जानेवारीलाही पावसाची शक्यता आहे. २२ जानेवारीला दिल्लीसह चंदीगड आणि हरियाणामध्ये पावसाची शक्यता आहे. २३ आणि २४ जानेवारी रोजी हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. २५ जानेवारीलाही दुर्गम भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशात २३ जानेवारीला काही भागात तर २४ जानेवारीला बहुतांश भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. २४ आणि २५ जानेवारीला पूर्व उत्तर प्रदेशात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.