तरुण भारत लाईव्ह । ०२ फेब्रुवारी २०२३। येत्या १५ फेब्रुवारीला शुक्र मीन राशीत प्रवेश करणार असून शुक्र आणि गुरूच्या संयोगामुळे नशिबाचा अत्यंत शुभ योग तयार होणार आहे. हा शुभ योग काही राशीच्या लोकांसाठी सुख आणि भाग्य बदलणारा ठरेल. त्या राशी कोणत्या आहेत हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.
मिथुन रास
या राशींच्या लोकांसाठी हा राजयोग शुभ असणार आहे. नोकरीत प्रमोशन मिळू शकते. व्यापारी वर्गातील लोकांना फायदा होईल. आरोग्य चांगले राहील. घरात आनंदी वातावरण राहील. नवीन वाहन किंवा नवीन मालमत्ता खरेदीची शक्यता आहे. या संक्रमणाच्या प्रभावाने तुम्हाला धनलाभ होण्याची शक्यता आहे.
कर्क रास
राजयोग कर्क राशीच्या लोकांसाठी जीवनाच्या विविध क्षेत्रात अनेक नवीन सुवर्ण संधी घेऊन येईल. शुक्र वरात आहे, तर बृहस्पति महाराज स्वतःच्या राशीत बसले आहेत. कर्क राशीच्या लोकांना अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना नोकरी मिळू शकते.
कन्या रास
कन्या राशीच्या लोकांसाठी नशीब बदलण्यासाठी राजयोग अत्यंत शुभ राहील. जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल तर तुम्हाला यावेळी आर्थिक लाभ मिळतील. वैवाहिक जीवनात सुरू असलेल्या समस्या संपतील आणि तुमच्या जोडीदारासोबतचे नाते अधिक घट्ट होईल. व्यापारी वर्गातील लोकांना फायदा होईल.
वृश्चिक रास
या संक्रमणाच्या प्रभावाने तुम्हाला धनलाभ होण्याची शक्यता आहे. शिक्षणात विशेष प्रगती होईल. कोर्टाचा निकाल तुमच्या बाजूने लागेल.थोरामोठ्यांचे आशीर्वाद मिळतील. उत्पन्नाची साधने वाढतील. मुलांकडून शुभवार्ता मिळेल. परदेश गमन योग संभवतो. वैवाहिक चर्चा यशस्वी होतील.