Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने आज निर्णय दिला. दरम्यान, याबाबत आम्ही समाधानी असल्याचे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. तसेच जे लोक कालपर्यंत सरकार जाणार म्हणत उड्या मारत होते त्यांच्या सर्व मनसुब्यावर पाणी फिरल्याचे फडणवीस म्हणाले. लोक चुकीच्या चर्चा करत होते. आम्ही पत्रकार परिषदेत सविस्तर याबाबतचे विश्लेषण करु असेही फडणवीस म्हणाले.
महाराष्ट्रतील सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयानं आज महत्वाचा निर्णय दिला. त्या निर्णयानंतर फडणीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोर्टाच्या निर्णयावर आम्ही समाधानी असल्याचे फडणवीस म्हणाले. थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संयुक्त पत्रकार परिषद घेणार आहेत.
या पत्रकार परिषदेत आम्ही सविस्तर बोलू असेही फडणवीस यावेळी म्हणाले. आज सर्वोच्च न्यायालयानं राज्यातील सत्तासंघर्षाबाबत महत्वाची निरक्षणे नोंदवली आहेत. यामध्ये सरकारवर ताशेरे ओढले आहेत. मात्र, सध्या तरी शिंदे-फडणवीस सरकार बचावले आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपावण्यात आला आहे.