---Advertisement---
जामनेर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर विकासकामांच्या उद्घाटनांचा धडाका सुरु झाला आहे. जामनेर नगर परिषदतर्फे शहरातील विविध भागातील सात कोटी होऊन अधिक खर्चाच्या विकास कामांचे मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
नगर परिषदेच्या वतीने शहरातील विविध भागात सौंदर्यीकरण व्यायाम शाळा क्लब हा ऊस कुस्ती आखाडा आणि खुल्या जागांचे विकास कामे हाती घेण्यात आली आहे. या कामांवर सात कोटी होऊन अधिक निधी खर्च करण्यात आला आहे.
जामनेर तालुक्यात सत्ताधारी भाजपाने विकासाचे मुद्दावर निवडणुकीला सामोरे जाण्याचे ठरवले असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांचे निवडणुकीचे जोरदार तयारी सुरू केली आहे. दुसरीकडे विरोधी पक्षांमध्ये मात्र अद्याप शांततेचे वातावरण दिसत आहे.
याप्रसंगी नगरपालिका मुख्याधिकारी नितीन बागुल, जिल्हा भाजपा अध्यक्ष चंद्रकांत बावस्कर, नगरपरिषद गट नेते डॉ. भोंडे, नगरसेवक राम महाजन, शरद पाटील, शिवाजी सोनार, रविंद्र झाल्टे, जामनेर शहरातील व तालुक्यातील भाजप कार्यकर्ते व नगरपालिका कर्मचारी व नागरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.









