महाराष्ट्रात थंडीचा कडाका पुन्हा वाढणार; हवामान खात्याने दिला इशारा

तरुण भारत लाईव्ह । २२ फेब्रुवारी २०२३।  राज्यातील अनेक ठिकाणी फेब्रुवारीमध्येच उन्हाचा पारा वाढला असून दुपारी उन्हाचा चटका तर रात्री आणि पहाटे थंडीचा कडाका असे चित्र आहे. आणखी दोन दिवस उन्हाची तीव्रता अधिक राहणार असून त्यानंतर पुन्हा गारवा जाणवणार असल्याचा अंदाज हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे.

राज्यात सध्या कोकण, मुंबई, ठाणे, मराठवाड्यासह विदर्भात कमाल तापमानात सरासरीपेक्षा 3 ते 4 अंशांनी वाढ झाली आहे. राज्यात मागच्या 24 तासांत नांदेड व धुळ्यात 37, परभणी 36.8, पुण्यात 36.4, जळगावात 36.5 तर औरंगाबादेत 36 अंश तापमानाची नोंद झाली. राज्यात अचानक कमाल तापमानात वाढ झाली आहे. यामुळे फेब्रुवारी महिन्यातच उन्हाच्या झळा बसत आहेत.

मात्र दोन दिवसानंतर राज्यात गारवा पसरण्याची शक्यता आहे. उत्तर भारतात पश्चिमी चक्रवातामुळे वातावरणात सतत्याने बदल होत आहेत.  दोन दिवसांनंतर पुन्हा राज्यातील वातावरणात गारवा पसरण्याची शक्यता आहे.