---Advertisement---

चोपडा बस स्थानकातील हिरकणी कक्ष ठरताय नावालाच, सुविधांअभावी वाढताय अडचणी

---Advertisement---

चोपडा : चोपडा बस स्थानक समस्यांच्या विळख्यात सापडले आहे. या ठिकाणी प्रवाशांना सुविधा मिळत नसल्याची स्थिती आहे. आहे ती यंत्रणादेखील नावालाच ठरल्याचे चित्र आहे. त्यातल्या त्यात बस स्थानकातील हिरकणी कक्षाची समस्या प्रामुख्याने जाणवत आहेत. या ठिकाणची हिरकणी कक्ष लावलाच ठरले असून, हे कक्ष उपयोगात येण्याऐवजी डोकेदुखी ठरत आहेत.

चोपडा बस स्थानकात माता व त्यांच्या मुलांसाठी दोन हिरकणी कक्ष उभारण्यात आले आहे. मातांना आपल्या मुलांना स्तनपान करता यावे यासाठी या कक्षाची उभारणी करण्यात आली आहे. मात्र हे कक्ष सध्या समस्यांच्या गर्तेत सापडले आहे. हिरकणी कक्षा जवळ रात्री दारुडे, रिकाम टेकळे झोपलेले आढळून येतात. यामुळे महिलांना या कक्षाचा वापर करताना असह्जपणा जाणवत आहेत. समस्यांनी घेरलेल्या या हिरकणी कक्षात माता जाण्यास धजावत नसल्याचे चित्र आहे.

बस स्थानकात दोन हिरकणी कक्ष असले तरी आज ते निरुपयोगीचे ठरत आहेत. या बस स्थानकात एक हिरकणी कक्ष स्थानक निर्मिती करताना, तर दुसरा रोटरी क्लबने जाहिरातीसाठी उभारला आहे. या हिरकणी कक्षाच्या आजूबाजूला कुत्रे लोडताना दिसतात. गर्दीच्या काळातही उद्घोषणा कक्षाच्या पुढील हिरकणी कक्ष अडचणीचे ठरत आहे.

दरम्यान, अंदाजे 50 हजार रुपये खर्च करून याआधीही चोपडा डेपोत एक हिरकणी कक्ष उभारण्यात आले होते. त्याची मोडतोड होऊन, वाया गेला. ते देखील एसटी कॅन्टीन अडचणीचे ठरले होते.

चोपडा बस स्थानकात रोटरी क्लबद्वारा पोलीस नियंत्रण कक्ष देखील उभारले होते. त्यांचं अस्तित्व आज पूर्णपणे नाहीसे झाले आहे. परिणामी गुन्हेगारीत वाढ झाली असून, महिलांच्या अंगावरील दागिने, रोकड रक्कम, खिसे कापून चे प्रमाण वाढले आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment