---Advertisement---

लग्नाचा वाढदिवस विसरला, बायकोने केला प्राणघातक हल्ला

---Advertisement---

मुंबई : लग्नाचा वाढदिवस विसरल्याने नवऱ्यावर बायकोने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा प्रकार मुंबईच्या घाटकोपरमध्ये घडला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंद केला आहे.

तक्रारदार विशाल यांनी पोलिसांनी दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, 18 फेब्रुवारी रोजी मुंबईच्या घाटकोपरमधील दाम्पत्याच्या लग्नाचा वाढदिवस होता. पतीने पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नाहीत आणि त्यांच्यात भांडण सुरू झाले. दुसऱ्या दिवशी पत्नीने त्याच्यापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आणि तिच्या आई आणि भावाला बोलावले आणि भांडण झाल्यानंतर त्यांनी त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंद केला आहे.

 

 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment