काळजी घ्या! गणेशोत्सवात साथरोगांचा होतोय कहर, जाणून घ्या लक्षणे…

---Advertisement---

 

Dengue symptoms : ऐन गणेशोत्सवात साथरोगांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. पावसाळ्यात निर्माण झालेली अस्वच्छता, दूषित अन्नपाणी, डास-कीटक आणि बदलते हवामान यामुळे नागरिक आजारी पडत आहेत. प्रत्येक घरी लहान-मोठ्या व्यक्तींना ताप, सर्दी, कोरडा खोकला, डोकेदुखी, जुलाब, उलट्या अशा साथीच्या आजारांची लागण होत आहे. यामुळे आरोग्य विभागाकडून सातत्याने जनजागृती केली जात आहे.

आजारपण टाळण्यासाठी ही घ्या खबरदारी

घरात व आजूबाजूला स्वच्छता ठेवा. डासांची पैदास होऊ नये म्हणून पाणी साठू देऊ नका. उकळलेले पाणीच प्यावे, झाकून ठेवलेले अन्नपदार्थ वापरा. रुग्णालयांमध्ये अतिरिक्त खाटा, औषधे व कर्मचारी उपलब्ध आहेत. शाळा, बाजारपेठ, गणेश मंडळे येथे स्वच्छतेच्या सूचना दिल्या आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांकडून दररोज फवारणी व तपासणी होत आहे.

अंगात कणकण, ताप आल्यास…

रुग्णसंख्या वाढत असल्याने हलकासा ताप, अंगदुखी, कणकण आल्यास दुर्लक्ष करू नये. घरगुती उपचाराऐवजी तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा. तात्काळ डॉक्टरांना भेटून उपचारही घ्यावेत.

गणेशोत्सवात प्रकृतीला जपा

मोठ्या गर्दीच्या ठिकाणी स्वच्छता व हात धुण्याचे नियम पाळा, दूषित पाणी, उघड्यावरचे खाद्यपदार्थ टाळावेत असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

कोणत्या आजाराची लक्षणे काय ?

अंगात तीव्र वेदना, डोकेदुखी, डोळ्यांच्या मागे वेदना, रक्त्तस्राव अशी डेंग्यूची लक्षणे आहेत. थंडी वाजून ताप येणे, घाम येणे ही मलेरियाची लक्षणे आहेत. उलट्या, जुलाब, अशक्तपणा ही अतिसाराची तर ताप सतत राहणे, भूक मंदावणे ही टायफॉईडची लक्षणे आहेत. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून जनजागृती होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---