मुंबई : मागील अनेक दिवसांपासून ठाकरे गट आमदार अपात्रेच्या मुद्दावरून विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाकडे डोळे लावून बसला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निर्णय घेत नसल्याने ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने यावर दोन आठवड्यात उत्तर सादर करण्यास सांगितलं होतं. ही मुदत शुक्रवारी संपणार आहे. त्यामुळे आमदार अपात्रतेचा मुद्दा तापणार हे निश्चित.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाचे विधानसभा अध्यक्षांकडून अवलोकन सुरू आहे. मागील दोन आठवड्यात उत्तर सादर करण्याचे न्यायालयाने आदेश दिले होते. ही मुदत शुक्रवारी संपणार आहे. तसेच विधीमंडळाकडून सर्वोच्च न्यायालयात अद्याप लेखी उत्तर देण्यात आलेले नाही.
उद्योग राज्याबाहेर कसे गेले’ यावर श्वेतपत्रिका
विद्यमान सरकारमुळे वेदांता, टाटा एअरबस सी २९५, सॅफ्रन व बल्क ड्रग पार्क हे मोठे उद्योग राज्याबाहेर गेले असा आरोप माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केला होता. यावर हे मोठे उद्योग राज्याबाहेर कसे गेले? याबाबतची श्वेतपत्रिका काढण्यात येणार असल्याची माहिती, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत लेखी उत्तरात दिली.
वेदांता, टाटा एअरबस सी २९५, सॅफ्रन व बल्क ड्रग पार्क हे मोठे उद्योग राज्याबाहेर गेले कसे त्यावंर श्वेत पत्रिका काढली जाणार असं ६ महिन्यांपूर्वी उद्योगमंत्री यांनी घोषित केले होते. यासंदर्भात आज विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आला होतो. त्यावर लवकरच श्वेतपत्रिका काढण्यात येणार असल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले.