तरुण भारत लाईव्ह । मुंबई : ‘द केरला स्टोरी’ चित्रपट प्रदर्शित होऊन आज चौथा दिवस उजाडला तरी त्याबद्दलचे वाद प्रतिवाद संपुष्टात यायचे चिन्ह दिसत नाही. अशातच उत्तर प्रदेशात ‘द केरला स्टोरी’ चित्रपट करमुक्त केला असल्याची घोषणा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली. त्याचबरोबर १२ मे रोजी लखनौ मध्ये संपूर्ण कॅबिनेटसह चित्रपट पाहायला जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
हा चित्रपट मंगळवारपासून उत्तर प्रदेशात करमुक्त केला गेला आहे. त्याचसोबत यापूर्वी मध्य प्रदेशमध्येही चित्रपट करमुक्त करण्यात आला होता. या पाठोपाठ महाराष्ट्रात देखील केरळ स्टोरी हा चित्रपट लवकरच करमुक्त होईल. याउलट तामिळनाडू आणि बंगाल मध्ये मात्र या चित्रपटावर कायदा व सुव्यवस्थेचे कारण सांगून निर्बंध लावण्यात आले होते.