तरुण भारत लाईव्ह । अनिरुद्ध पांडे । आपल्याकडे, म्हणजे महाराष्ट्रात बालकांचा (Teachers Eligibility Test) मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अंतर्गत एक शिक्षक पात्रता परीक्षा घेतली जाते. मराठीत शिक्षक पात्रता परीक्षा, इंग्रजीत ‘टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट’ म्हणजेच थोडक्यात असे या परीक्षेला म्हणतात. ही टीईटी उत्तीर्ण असणे म्हणजेच ‘पास’ असणे आता शिक्षक म्हणून काम करण्याची इच्छा असलेल्या प्रत्येकासाठी नियमानुसार गरजेचे झाले आहे. कोणत्याही प्रकारची अनुदानित, विनाअनुदानित किंवा कायम अनुदानित शाळा आता टीईटी उत्तीर्ण नसलेल्या व्यक्तीला शिक्षक म्हणून नियुक्त करू शकणार नाही, तसेच कोणतेही व्यवस्थापन, कोणतेही माध्यम यांच्यासाठीही आता म्हणजे ‘क्वालिफाईंग एक्झामिनेशन’ झाली आहे, नव्हे या पात्रता परीक्षेला पर्यायच नाही. ही परीक्षा घेण्याची जबाबदारी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे आहे. त्यांनी 2019 ची ‘महा-टीईटी 2019’ ही परीक्षा 19 जानेवारी 2020 रोजी घेतली. तिचा निकाल 28 ऑगस्ट 2020 रोजी लावला. पहिली ते आठवी या वर्गाच्या शिक्षकांसाठी पहिली ते पाचवी आणि ते आठवी अशा दोन गटांत ही परीक्षा होते. त्यावेळी पहिल्या गटासाठी 1 लाख 88 हजार 688 उमेदवार परीक्षेला बसले होते. त्यापैकी फक्त 10 हजार 487 म्हणजे 5.56 टक्केच उत्तीर्ण झाले. दुसर्या गटासाठी 1 लाख 54 हजार 596 जण परीक्षेला बसले. त्यापैकी फक्त 6 हजार 105 म्हणजे 3.95 टक्के उत्तीर्ण दोन्ही गट मिळून 16 हजार 593 म्हणजे केवळ 4.83 टक्केच शिक्षक होण्यासाठी पात्र ठरले होते.
भावी शिक्षकांचे ज्ञान 4.83 टक्के!
त्यानंतरची टीईटी (Teachers Eligibility Test) 21 नोव्हेंबर 2021 रोजी झाली. 23 डिसेंबर 2022 ला या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यावेळी तर हा निकाल आणखी घसरला असून, जुन्या 4.83 टक्क्यांच्या तुलनेत आता 3.70 वर उतरला आहे. ही परीक्षा शिक्षक देत असल्यामुळे त्यातील तरतुदींनुसार बारावी व डीएड आणि पदवी व बीएड अशी त्यांची आवश्यक शैक्षणिक गुणवत्ता असते. पहिली ते आठवीपर्यंतच्या शिक्षकांसाठी कोणताही जड, भारी, वरचा किंवा उच्च असा अभ्यासक्रम या पात्रता परीक्षेसाठी नसतो, तर तो त्या-त्या गटाला, ज्या-ज्या वर्गाला जो अभ्यासक‘म शिकवायचा आहे, तोच अभ्यासक्रम या पात्रता ठरविणार्या असतो, हे खासकरून नमूद करण्यासारखे आहे. गुणवत्ता किंवा पात्रता हे शब्द फालतू वाटतील आणि ‘लायकी’ हाच शब्द वापरायची इच्छा होईल, असाच हा निकाल आहे. या ताज्या निकालानुसार पहिली ते पाचवीसाठी झालेल्या परीक्षेला बारावी व डीएड झालेले 2 लाख 54 हजार 428 भावी शिक्षक बसले होते. त्यापैकी फक्त 9 हजार म्हणजेच 3.80 टक्के उत्तीर्ण झाले आहेत. सहावी ते आठवी या गटासाठी गणित व विज्ञान विषयांसाठी 64 हजार 647 पदवी व बीएड या ‘गुणवत्ते’चे भावी शिक्षक परीक्षार्थी बसले होते. त्यापैकी फक्त 937 म्हणजे 1.45, म्हणजेच दीड टक्क्यांपेक्षा कमी यशस्वी झाले आहेत. या ‘अयशस्वी’ भावी शिक्षकांसाठी ‘दीड दमडीचे’ असा शब्दप्रयोग करायला हरकत नसावी!
सहावी ते आठवी गटासाठी सामाजिक शास्त्र (Teachers Eligibility Test) या विषयासाठी स्वतंत्र परीक्षा होती. ही परीक्षा 1 लाख 49 हजार 604 भावी शिक्षकांनी दिली. त्यापैकी चक्क 1 लाख 42 हजार 993 ‘नापास’ झाले. पास झालेल्या 6,711 भावी शिक्षकांची टक्केवारी 4.49 म्हणजे पाच टक्क्यांपेक्षाही कमी आहे. तरी गणित व विज्ञानवाल्या दीड नसलेल्यांपेक्षा पाच टक्केही नसल्याचे प्रमाण चक्क तिप्पट आहे, यातही समाधानच मानावे लागेल.
थोडक्यात म्हणजे, 2021 मध्ये झालेल्या टीईटी (Teachers Eligibility Test) या शिक्षक पात्रता परीक्षेला एकूण 4 लाख 68 हजार 679 शिक्षक होऊ इच्छिणारे बसले होते. त्यापैकी फक्त 17 हजार 322 म्हणजे 3.70 टक्के यशस्वी झाले, शिक्षक होण्यासाठी पात्र ठरले. गेल्या वेळच्या, 2019 मध्ये झालेल्या, 4.83 टक्के निकाल लागलेल्या परीक्षेत जवळपास अर्ध्या, म्हणजे एकूण पात्र ठरलेल्या 16 हजार 592 पैकी 7 हजार 884 भावी शिक्षकांवर गैरप्रकार केल्याचा आरोप ठेवून अपात्र करण्यात आले आहे. किती भयंकर आणि किती लाजिरवाणे! आता नुकत्याच पात्र ठरलेल्या 17,322 पैकी किती भावी शिक्षक गैरप्रकारांमध्ये अडकतात, ते लवकरच येईल. हे सारेच धक्कादायक असले तरी भावी पिढी घडविण्याची जबाबदारी असलेल्या या माणसांच्या ज्ञानाची, पात्रतेची तपासणी सरकार करते आहे, हा आनंदाचा, समाधानाचा आणि गरजेचा विषय नक्कीच आहे. (Teachers Eligibility Test) शैक्षणिक क्षेत्रात सध्या मिळत असलेल्या पगाराचा आणि त्यांच्यावर असलेल्या जबाबदारीचा विचार केल्यास त्यासाठी खरे पात्र, खरे लायक शोधण्याचा प्रयत्न ‘टीईटी’तून होत असल्याचा सध्या तरी येतो आहे, हेही नसे थोडके!