हिंदू संस्कृतीच्या देशाचा तुर्कीला संदेश !

 

– तरुण विजय

Erdogan on India जेव्हा एखादी व्यक्ती किंवा देश संकटात सापडतो तेव्हा त्या देशाला केलेली मदत आणि सहकार्य हा मानवधर्म आहे आणि या कार्याचा उपकार म्हणून किंवा प्रसिद्धीसाठी वापर करणे अपेक्षित नाही.

नुकत्याच झालेल्या भूकंपात तुर्की आणि सीरियामध्ये प्रचंड विध्वंस झाला. Erdogan on India हजारो स्त्रिया, पुरुष आणि मुले काळाचे भक्ष्य ठरले. त्यांची भीषण अवस्था, वेदना आणि व्यथा यांचा उल्लेख करताना संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कंठ दाटून आला, त्यांचे डोळे पाणावले. तुर्की आणि सीरियाला मदत करण्यासाठी औषधे, मदत सामग्री आणि आपत्ती व्यवस्थापनातील शूर सैनिक पाठवणा-या पहिल्या देशांपैकी भारत अग्रणी होता. Erdogan on India ते आमचे कर्तव्यच होते, धर्म होता. आमचा आदर्श वीर कन्हैयाचा आहे, त्या महान शीख योद्ध्याने मुघलांशी लढताना, संध्याकाळी युद्ध संपल्यावर जखमी मुस्लिम सैनिकांना पाणी पाजले होते. Erdogan on India एखाद्याच्या दुःखात शत्रुत्व निर्माण करणे हे गिधाडांचे काम आहे, माणसांचे नाही.

जगातील अनेक देशांनीही मदत पाठवली. Erdogan on India एका मुस्लिम विद्वानाने ट्विटरवर ट्विट केले की, तुर्कीची टोकाची इस्लामिक प्रवृत्ती असूनही बिगर मुस्लिम भारताने मोठ्या प्रमाणात मदत पाठवली. आता मुस्लिम देशांनी प्रार्थना पाठवली. भारतदेखील केवळ प्रार्थना करू शकला असता आणि भारताचे राष्ट्रप्रमुख तुर्कीचे अध्यक्ष एर्दोगान यांच्याशी फोनवर बोलू शकले असते आणि संपूर्ण देशाच्या वतीने शोक व्यक्त करीत विषय संपवला असता. Erdogan on India पण, आम्ही तसे केले नाही. कारण तुर्की प्रत्येक पावलावर आणि प्रत्येक मुद्यावर वैरभाव अंगीकारत असला, त्याने भारताच्या प्रत्येक अंतर्गत निर्णयाला मुस्लिम दृष्टिकोनातून अतार्किकपणे विरोध केला असला, आंतरराष्ट्रीय व्यासपीठाला काश्मीरच्या तथाकथित स्वातंत्र्याला पाठींबा दिला असला, तरी ते सर्व मुद्दे त्यांच्या जागी राहतील. Erdogan on India मात्र, मानवतेच्या मापदंडावर या मुद्यांचा मदतकार्याशी काहीही संबंध नाही. ही विचारधारा अतिशय विशाल, उदार आहे आणि भारताला जगातील इतर सर्व ख्रिश्चन आणि मुस्लिम देशांपेक्षा आपले वेगळेपण ठळकपणे अधोरेखित करणारी आहे. Erdogan on India या उदार, मानवतावादी विचारसरणीमुळेच भारताला जगात प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. भारतातील अनेक राजकीय वादळांचा, राजकीय मुद्यांचा थेट तुर्कीशी संबंध आहे.

Erdogan on India जेव्हा तुर्कीत खिलाफत संपुष्टात येत होती आणि तुर्कीच्या कट्टर इस्लामी प्रतिमेचे केमाल अतातुर्कच्या नेतृत्वाखाली तीव्र पाश्चिमात्यीकरण होत होते तेव्हा तुर्कीतील मुल्ला मौलवींनी केलेल्या विरोधापेक्षा भारतीय मुसलमानांनी खिलाफत चळवळीच्या माध्यमातून केलेला विरोध अधिक तीव्र होता. Erdogan on India दुस-या शब्दात सांगायचे खिलाफत प्रश्नावर तुर्कीतील मुल्ला मौलवीपेक्षा भारतीय मुसलमानांनीच अधिक कट्टर भूमिका घेतली होती. गांधीजींनी मुस्लिमांशी मैत्रीच्या लालसेपोटी पुरोगामी केमाल अतातुर्कला विरोध करून प्रतिगामी अशा खिलाफत चळवळीला पाठींबा दिला आणि हिंदूंना भ्याड ठरवणा-या कट्टरपंथी जिहादी इस्लामी अली बंधूंना पाठींबा दिला. Erdogan on India खिलाफत चळवळ अयशस्वी झाली. केमाल अतातुर्कने तुर्की भाषेसाठी अरबी लिपी हटवून रोमन लिपी प्रचलित केली. कुराण रोमन लिपीतून शिकविण्यात येऊ लागले. पाश्चिमात्यीकरणाच्या माध्यमातून देशात आधुनिकतेची सुरुवात झाली आणि नंतर तुर्कस्तानने युरोपियन युनियनचा सदस्य होण्यासाठी प्रयत्न सुरू केले. Erdogan on India केमाल अतातुर्क भारतातही लोकप्रिय झाले आणि काही वर्षांपूर्वीपर्यंत पंतप्रधान निवास मार्गाचे नाव केमाल अतातुर्क मार्ग असे होते.

परंतु, आधुनिक पुरोगामी आणि उज्ज्वल भविष्यकाळाच्या दिशेने होत असलेली वाटचाल जिहादी व इस्लामी कट्टरवाद्यांना कधीच मानवली नाही. Erdogan on India स्त्रियांनी आधुनिक शिक्षण घेऊन प्रगती करणे जुनाट, प्राचीन रूढी-परंपरांचा त्याग करणे, ज्ञान-विज्ञान आणि कला संस्कृतीच्या क्षेत्रात मुक्त चिंतन आणि नवनवे प्रयोग मुल्ला मौलवींना कधीच आवडले नाही. तालिबानी ज्या प्रकारे अफगाणिस्तानात महिलांना जाहीरपणे फटके मारत आहेत, शाळा-महाविद्यालयांमध्ये मुलींच्या शिक्षणावर निर्बंध लादत आहेत, Erdogan on India मुस्तफा केमाल अतातुर्कची आधुनिक क्रांती मुल्लांच्या दबावाखाली धुळीस मिळू लागली. इस्लाम समर्थक ए.के.पी. या राजकीय पक्षाला २००२ च्या निवडणुकीत ३४ टक्के आणि २००७ च्या निवडणुकीत ४६.६ टक्के मते मिळाली होती. Erdogan on India केमाल अतातुर्क समर्थक लोकांची मोठी पीछेहाट झाली आणि तुर्की पुन्हा खिलाफतच्या कालखंडातील कट्टर इस्लामिक लाटेत वाहून गेले आणि तेव्हापासूनच तुर्कीने संयुक्त राष्ट्र संघटना, ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक युनियन आणि इतर आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर भारतात मुस्लिमांवर अत्याचार होत असल्याचा आरोप करीत मोदींविरोधात जोरदार आघाडी उघडली.

Erdogan on India जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवून त्याला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देऊन लडाखला वेगळे करण्याला तुर्कीचे राष्ट्रपती एर्दोगान यांनी विरोध केला आणि काश्मीरच्या भारतापासून वेगळे करण्यास पाठींबा दिला. म्हणजेच पाकिस्तानने भारताविरुद्ध जी वक्तव्ये केली त्याचीच पुनरावृत्ती तुर्कीने केली.Erdogan on India पाकिस्तानप्रेरित व वित्तपोषित दहशतवादावर तुर्कीने नेहमीच मौन बाळगून भारताविरोधात पाकिस्तानचे समर्थन केले. अशा देशाला तुम्ही काय म्हणाल? मित्र देश की शत्रू देश? Erdogan on India आणि त्या देशाच्या वेदनेमुळे दु:ख होऊन आमचे पंतप्रधान पाणावलेल्या डोळ्यांनी व अवरुद्ध कंठाने त्या देशाच्या दु:खावर सहानुभूतीची फुंकर घालत असतील, त्या देशाला मदत पाठवत असतील तो मानवतेच्या सर्वोच्च पातळीचा परिचय म्हणावा लागेल. Erdogan on India वास्तविक पाहता आज जागतिक राजकारणाचे सत्य हेच आहे की, कोणतेही दोन मुस्लिम देश एकमेकांचे मित्र नाहीत. बहुसंख्य मुस्लिम लोक मुसलमानांच्या आपसातील युद्धात मारले जात आहेत. Erdogan on India पाकिस्तानात शिया-सुन्नी रक्तरंजित संघर्ष, मशिदींमध्ये बॉम्बस्फोट, अहमदिया मशिदी उघडपणे पाडल्या जात आहेत, त्यांच्या मुलांना मुस्लिमदेखील मानले जात नाही.

पण जेव्हा हिंदूंचा प्रश्न येतो तेव्हा ते सर्व परस्पर वैर विसरून हिंदूंच्या विरोधात एकवटतात. तुर्कीचीही तीच अवस्था आहे. सौदी अरब, सीरिया, लिबिया व आखातातील कोणत्याही मुस्लिम देशाशी तुर्कीचे चांगले संबंध नाहीत. कट्टरवादामुळे त्या देशाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. Erdogan on India पण ज्याप्रमाणे पाकिस्तान गरिबी, टंचाई आणि उपासमारीच्या काळातही भारताशी असलेले वैर विसरत नाही, त्याचप्रमाणे तुर्की आपल्या सामाजिक आणि आर्थिक प्रगतीकडे पाहण्याऐवजी काश्मीर मुद्यावर भारताशी वैर पत्करत आहे, तिथे हिंदूंची चेष्टामस्करी करणारे चित्रपट बनवले जातात (जे आपण गुगलवर पाहू शकतो.) मात्र, भारताच्या कोणत्याही सुख-दु:खात तुर्कीने कुठलीही सहानुभूती दर्शविली नाही. Erdogan on India दु:खाची गोष्ट ही आहे की, भारतातील तथाकथित सेक्युलर मंडळी प्रत्येक मुद्यावर मोदी सरकारवर हल्ला चढवतात, त्यांनी मोदी सरकारने उचललेल्या मानवतावादी पावलावर जाणीवपूर्वक मौन बाळगले. Erdogan on India पण त्यामुळे काय बिघडले? सूर्याला चमकण्यासाठी काजव्याच्या प्रमाणपत्राची कधी गरज होती?