जळगाव : राज्यासह जिल्ह्यात महिलांवरील अत्याचाराच्या प्रमाणात वाढ झाली आहे . अशातच लग्नाचे खोटे आमिष दाखवून ३६ वर्षीय महिलेवर वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस सूत्रानुसार, पीडित महिलेवर लग्नाचे आमिष दाखवुन रिजवान जैनउद्दीन शेख (४२) याने मे २००८ ते १५ मे २०२३ पर्यंत वारंवार अत्याचार केला. पाचोरा , जळगाव, चाळीसगांव अश्या विविध ठिकाणी लॉजवर नेऊन पीडितेवर अत्याचार केला.
इमरान जैनउद्दीन शेख रा. वाल्मिकनगर, चाळीसगाव याने १५ मे २०२३ रोजी फिर्यादी शुध्दीत नसताना फिर्यादीचे संमतीशीवाय शारीरीक संबंध केले. तसेच रिजवानचा भाऊ इमरान जैनउद्दीन शेख, मोहिद्दीन जैनउद्दीन शेख व रिजवानची बायको इशरतबी यांनी फिर्यादीस वारंवार अश्लील शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलीस ठाण्यात रिजवान जैनउद्दीन शेख इमरान जैनउद्दीन शेख, मोहिद्दीन जैनउद्दीन शेख, रिजवानची बायको इशरतबी सर्व रा. यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वलटे करीत आहे.