नागरिकांनो सावधान! ‘या’ ठिकाणी उष्णतेची लाट.., हवामान विभागाने दिला सतर्कतेचा इशारा

The temperature rose : राज्यातील वाढलेलं तापमान चिंतेचा विषय बनला आहे. भारतीय हवामान विभागाच्या इशाऱ्यानेही टेन्शन वाढलं आहे. आठवडाभरापासून तापमानात सातत्याने वाढ होत आहे. दरम्यान हवामान विभागाकडून ब्लॅकआउटचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांना उष्माघाताचा धोका असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

उष्णतेच्या लाटेचा प्रभाव इतका गंभीर होत चालला आहे की, आतापर्यंत अनेकांचा मृत्यू झाला आहे. दिवसभर उन्हात कष्टाचं काम करणाऱ्यांना या उष्णतेचा सर्वात जास्त धोका आहे. भारतीय हवामान विभागाने हरियाणा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार आणि ओडिशासह अनेक भागांमध्ये उष्णतेच्या लाटेबाबत अलर्ट जारी केला आहे.

देशातील अनेक राज्यांमध्ये तापमान सामान्यपेक्षा जास्त आहे. ओडिशाच्या अनेक भागात सोमवारी तापमान ४४ अंश सेल्सिअसच्या वर पोहोचले होते. हवामान विभागाच्या माहितीनुसार देशात यावर्षी सामान्यपेक्षा जास्त उष्णता आहे. 2022 मध्येही अशीच स्थिती होती.

लोकांनी गरज असेल तर भर उन्हात बाहेर पडावं. फिक्या रंगाचे, सैल आणि सुती कपडे घालावे. डोके झाकावे असा सल्ला हवामान विभागाने दिला आहे. पश्चिम बंगालमध्ये तर तीव्र उष्णता आणि उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी या आठवड्यात सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्या आहेत.

दरम्यान, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या विभागांमध्ये ही काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेची सदृश स्थिती असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. तसेच नागरिकांनी उन्हाची तीव्रता कमी होईपर्यंत शक्यतो बाहेर पडू नये, असा इशाराही दिला आहे.