देशाची ‘मन की बात’

तरुण भारत लाईव्ह न्युज: आज आपण ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या 100व्या भागाच्या प्रसंगी दोन खास गोष्टी शिकल्या पाहिजेत. पहिली गोष्ट अशी आहे की, जर आपल्याला सत्ता आणि राजकीय यश मिळवायचे असेल, तर आपल्याला लोकांच्या भावना समजल्या पाहिजेत. दुसरी गोष्ट अशी आहे ती म्हणजे संवादाचे माध्यम. जुन्या रेडिओसारख्या माध्यमाचा वापर करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज प्रत्येकाच्या हृदयात विराजमान झाले आहेत.

अगदी सुरुवातीपासूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेशी आणि त्यांच्या भावनेशी जोडून आपल्या शासन व्यवस्थेला नवीन आयाम देत आहेत. त्यांच्या कुशल संवाद आणि जनतेशी थेट संपर्क साधण्याच्या अद्वितीय कौशल्यामुळे आज ते जगातील लोकप्रिय नेत्यांच्या यादीत सर्वात वरच्या स्थानावर आहेत. ते ज्या प्रकारे सामाजिक, भावनिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या जनसामान्यांशी जोडले जातात, ते केवळ आश्चर्यकारक आहे. म्हणूनच ते प्रत्येकाच्या हृदयावर राज्य करतात. सर्व वयोगटातील लोकांशी सहजपणे संपर्क साधण्याची आणि त्यांच्यापर्यंत योग्य तो संदेश पोहोचवण्याची नैसर्गिक क्षमता त्यांच्या व्यक्तिमत्त्वात आहे.

2014 मध्ये पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी संवादासाठी आधुनिक युगातील अनेक पद्धती अवलंबल्या. परंतु, त्यांनी अवलंबलेली एक अनोखी पद्धत, ज्याने संपूर्ण जगाला चकित केले, ते म्हणजे दर महिन्याला प्रसारित कार्यक्रम ’मन की बात.’ याच अनुषंगाने आता कोट्यवधी श्रोते 30 एप्रिल रोजी ‘ऑल इंडिया रेडिओ’वर या मासिक प्रसारणाच्या 100व्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संवादाच्या या अभिनव आणि कलात्मक पद्धतीने गेल्या काही वर्षांत लोकप्रियतेचे सर्व मापदंड मागे टाकले आहेत, हेसुद्धा विशेष.

मी 1990च्या दशकात रविवारी सकाळी रामायण आणि महाभारत मालिकांची आतुरतेने वाट पाहायचो. आज तेच आकर्षण आणि ‘क्रेझ’ लोकांमध्ये मला ’मन की बात’ कार्यक्रमासाठी पाहायला मिळते. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी, लाखो लोक एकत्र येऊन आणि त्यांच्या लोकप्रिय नेत्याचे उद्बोधक, उत्साहवर्धक, प्रेरणादायी भाषण ऐकण्यासाठी उत्सुक असतात. हा इतका अभ्यासाचा मुद्दा आहे की, त्यामागे जाऊन त्याची कारणमीमांसा केली पाहिजे. यासोबतच प्रत्येकाने यातून बोध घ्यावा. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, हा असा संवाद सेतू आहे. ज्यामध्ये समाजातील अनेक शूर सुपुत्र सहभागी होतात. ज्यांना जीवनात प्रसिद्धी मिळाली नाही किंवा ज्यांच्याबद्दल आजही कोणाला माहिती नाही, ते लोक या कार्यक्रमाच्या माध्यमातून बोलू शकतात. त्यांची स्वतःची एक भाषा असते. ती एक गौरवगाथा असते, अशा अज्ञात नायकांच्या कथा ऐकण्याचा थरार लोकांना फार आवडतो. अशाप्रकारे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवादाचे जे माध्यम वापरले आहे, ते अत्यंत प्रभावी आहे. ज्याद्वारे संदेश स्पष्ट आणि प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचविला जातो. या संवादात सहभागी होण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाला, वर्ग, वय, भाषा, संस्कृती यांचा विचार न करता, पुरेशी संधी आणि जागा उपलब्ध असते.

या कार्यक्रमाची आणखी एक मजेदार आणि मनोरंजक गोष्ट म्हणजे, ’मन की बात’ थेट हृदयातून येते. पंतप्रधान कोणत्याही प्रकारची गोष्ट बोलत नाहीत, परंतु येथे जनतेचा आवाज त्यांच्या हृदयातून बाहेर येतो. ही खर्‍या अर्थाने देशातील प्रत्येकाच्या मनातील गोष्ट आहे. यातून पंतप्रधान आणि सामान्य जनता यांच्यात विलक्षण नाते तयार झालेले दिसते. जनतेच्या भावनेचे प्रतिबिंब या कार्यक्रमात उमटते. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकप्रिय नेते ठरले आहेत. त्यामुळे आपण सामाजिक, सांस्कृतिक विकासाच्या टप्प्यावर आहोत.

‘मन की बात’ कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छ भारत अभियान’, हुंडा प्रथा, महिला सक्षमीकरण, अमली पदार्थांचे व्यसन, सामाजिक कार्य, संगीत, कला, संस्कृती, स्वयंरोजगार प्रशिक्षण, अवयवदान, जलसंधारण असे समाजाचे दूरगामी आणि व्यापक प्रश्न अनेकदा मांडले आहेत. नागरिकांशी संबंधित जवळपास सर्वच बाबींवर आपले म्हणणे मांडत त्यांनी लोकांना जागरूक करण्याचा प्रयत्न केला आहे. लोकांना त्यांच्या हक्कांची जाणीवही करून दिली आहे. जनहिताची प्रेरणा देणारे शब्द त्यांच्या भाषणात नेहमीच आढळतात.

या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, हा संवाद अराजकीय स्वरूपाचा आहे. पंतप्रधानांनी जनहिताच्या बाबी राजकारणापासून दूर ठेवल्या आहेत. त्यांच्या भाषणातील मुख्य मुद्दे लोकसेवा आणि जनहित हे असते. त्यांनी प्रेरणा, महत्त्वाकांक्षा आणि प्रयत्न यांच्यात त्यांनी नेहमीच परिपूर्ण संतुलन साधले आहे. आत्तापर्यंत झालेल्या सर्व भागांत त्या कथेचा नायक एक सामान्य माणूस होता, मग तो भारतातील असो वा जगाच्या इतर कुठल्यातरी अज्ञात कोपर्‍यातून असो, नायक हा सामान्य माणूस असतो.
अशा साध्या गोष्टीतून कृतीचे सकारात्मक आणि प्रेरणादायी धडे मिळू शकतात याचे हे उत्तम उदाहरण आहे. राष्ट्र उभारणीच्या मार्गावर ही सर्व नागरिकांची सामूहिक जबाबदारी आहे, हे अधोरेखित झाले आहे.़

प्रत्येक नागरिकाने समाजकार्यात सहभागी व्हावे, अशी त्यांची इच्छा आहे. सामान्य माणसाच्या किंवा नागरिकाच्या त्यांच्या जीवनाच्या विविध क्षेत्रांतील असाधारण सहकार्याचा ते नेहमी उल्लेख करतात, त्याचप्रमाणे त्याचे महत्त्व सांगण्यासही पंतप्रधान नरेंद्र मोदी कधीही कमी पडत नाहीत.

आज आपण या कार्यक्रमाच्या 100व्या भागाच्या प्रसंगी दोन खास गोष्टी शिकल्या पाहिजेत. पहिली गोष्ट अशी आहे की, जर आपल्याला सत्ता आणि राजकीय यश मिळवायचे असेल, तर आपल्याला लोकांच्या भावना समजल्या पाहिजेत. दुसरी गोष्ट अशी आहे ती म्हणजे संवादाचे माध्यम. जुन्या रेडिओसारख्या माध्यमाचा वापर करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज प्रत्येकाच्या हृदयात विराजमान झाले आहेत. इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या तांत्रिक क्रांतीच्या युगात त्यांनी रेडिओचे माध्यम संवाद साधण्यासाठी वापरले. आकाशवाणीवरील ’मन की बात’ या कार्यक्रमाच्या यशावरून ही गोष्ट लक्षात येते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जनतेच्या मनातील भावना सहज ओळखता येतात. अगदी पाच वर्षांच्या मुलापासून ते 100 वर्षांच्या माणसापर्यंत सर्व वयोगटातील लोक ’मन की बात’ ऐकण्यासाठी रेडिओ सेटला चिकटून बसतात. महिन्याच्या शेवटच्या रविवारी त्यांचे लाडके पंतप्रधान पुन्हा एकदा सर्व श्रोत्यांच्या हृदयाला, मनाला आणि आत्म्याला स्पर्श करतील या आशेने, वाट पाहतात. हेच ’मन की बात’ कार्यक्रमाचे वैशिष्ट्य आहे.

– आचार्य पवन त्रिपाठी