मोठी बातमी ; मोदी सरकारने अचानक बोलवलं ५ दिवसांचं विशेष अधिवेशन

नवी दिल्ली : संसदेचं पावसाळी अधिवेशन नुकतंच संपन्न झालेलं आहे. पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर लगेचच संसदेचे पाच दिवसांचे विशेष अधिवेशन बोलविण्यात आले आहे. संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी गुरुवारी ट्वीट करुन याबद्दल माहिती दिलीय. १८ ते २२ सप्टेंबर दरम्यान हे सत्र बोलावण्यात आलेलं आहे. या सत्रामध्ये १० विधेयकं मांडली जाणार आहेत.

हिवाळी अधिवेशनापूर्वीच संसदेचे विशेष सत्र बोलावण्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. 18 ते 22 सप्टेंबरपर्यंत या अधिवेशनाचा कालावधी ठेवण्यात आला आहे. 17व्या लोकसभेचे हे 13वे आणि राज्यसभेचे 261वे अधिवेशन असणार आहे. अमृत ​​काळच्या दरम्यान संसदेच्या विशेष अधिवेशनात अर्थपूर्ण चर्चा आणि चर्चा अपेक्षित आहे.

संविधानाच्या कलम ८५ मध्ये संसदेचे अधिवेशन बोलवण्याची तरतूद आहे. या अंतर्गत सरकारला संसदेचे अधिवेशन बोलवण्याचा अधिकार आहे. संसदीय कामकाजावरील कॅबिनेट समिती निर्णय घेते. त्याला राष्ट्रपतींची संमती असते. याद्वारे खासदारांना अधिवेशनात बोलावले जाते.