तरुण भारत लाईव्ह । २० मे २०२३। अयोध्यातील श्रीराम मंदिराची प्रतीक्षा देश- विदेशातील भाविकांना आहे. त्यामुळे मंदिराचे काम ज्या टप्प्यात पोहोचले, त्या त्या टप्य्याची माहिती ट्रस्टच्या वतीने भाविकांपर्यंत पोहोचवली जात असते. आता श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने प्रभू रामल्लाच्या बांधकामाधीन मंदिराच्या तळमजल्यावरील खांब आणि भिंतींवर कोरलेल्या दगडांवरील कलाकृतींचे फोटो शेयर केले आहेत.
राम मंदिराच्या भिंतींवर या पौराणिक कलाकृती बसवण्यात येणार आहे. राम मंदिर ट्रस्टने अधिकृत ट्विटर हॅन्डलवरून एक फोटो प्रसिद्ध केला असून, त्यात लिहिले आहे कि आपल्या पुराण आणि शास्त्रांच्या कथांवर आधारित दगडांवर सुंदर मूर्ती कोरल्या जात आहे. हे नंतर बांधकाम वेळापत्रकानुसार श्री रामजन्मभूमी मंदिरातील खांब पाया आणि इतर नियुक्त केलेल्या ठिकाणी बसविल्या जाणार आहेत.
श्रीराम जन्मभूमी ट्रस्ट सातत्याने राम मंदिरांच्या बांधकामाची प्रगती आणि कलाकृतींची छायाचित्रे वेळोवेळी प्रसिद्ध करीत आहे आता श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या अधिकृत ट्विटर हॅण्डल वर पौराणिक कलाकृतींचे छायाचित्रेही शेअर करण्यात आली आहे. की श्रीराम जन्मभूमी मंदिरांच्या खांबावर आणि इतर नियुक्त ठिकाणी स्थापनेसाठी धर्मग्रंथात नमूद केलेल्या कथांच्या आधारे सुंदर मूर्ती तयार केल्या जात आहेत. मिळालेल्या माहितीनुसार या कलाकृती कारसेवकपुरम मध्ये तयार केल्या जात आहेत पहिल्या मजल्याच्या बांधकामाचे काम जवळपास पूर्णत्वास आले आहे.