तापमानाचा कहर थांबवून वसुंधरेचे ऋण फेडण्यासाठी वृक्षारोपण काळाची गरज !

नंदुरबार : येथील शहीद शिरीषकुमार मित्र मंडळ आणि ओम शांती परिवारातर्फे 200 बेलपत्र रोपांचे विनामूल्य वाटप केले. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आणि भविष्यातील तापमानाचा कहर थांबविण्या करिता प्रत्येक व्यक्तीतर्फे पृथ्वीतलावर मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड होणे गरजेचे आहे. वृक्षांपासून मिळणारा ऑक्सिजन, सावली आणि फळे प्राप्त होत असल्याने मानवाने वसुंधरेचे ऋण फेडण्यासाठी मुलाबाळांप्रमाणे वृक्षांचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करावेत असे प्रतिपादन प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या नंदुरबार केंद्र संचालिका बीके योगिता दीदी यांनी केले.

नंदुरबार शहारातील शहीद शिरीषकुमार मित्र मंडळ आणि प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय अर्थात ओम शांती परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने नंदुरबार जिल्हा वर्धापन दिन, कृषी दिन आणि मंडळाचे अध्यक्ष महादू हिरणवाळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बालवीर चौक परिसरात सुमारे 200 बेलपत्र आणि इतर उपयुक्त रोपांचे विनामूल्य वाटप करण्यात आले. सध्या शहरातील विविध वसाहतींमध्ये महादेव मंदिर बांधण्यात आले आहेत. शिव पिंडीवर चढवण्यासाठी लागणारे बेलपत्रांना मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे. शिवभक्तांची ही अडचण लक्षात घेऊन शहीद शिरीष कुमार मित्र मंडळातर्फे विनामूल्य बेलपत्र रोपांचे वाटप करण्यात आले. बेलपत्र वाटप प्रसंगी बीके योगिता दीदी, बीके वर्षा दीदी, सहकार भारतीचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष एडवोकेट के. आर. पाठक, महाराष्ट्र ग्राहक पंचायतचे सदस्य बी.डी. गोसावी, छाया जैन प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश जैन, महिला सक्षमीकरणच्या जिल्हा सदस्या श्रीमती सुलभा महिरे, क्षत्रिय राजपूत समाजाचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष मोहिनीराज राजपूत, मदन राजपूत, योगेश राजपूत, एडवोकेट अविनाश पाटील, पतंजलीचे तालुका अध्यक्ष भाऊसाहेब गिरासे,भास्कर रामोळे, निषाद पार्टीचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रताप सोनवणे, जगन खेडकर, डॉ. भूषण पालकडे उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंडळाचे ज्येष्ठ सल्लागार निवृत्त शिक्षक जी. एस. गवळी यांच्या मार्गदर्शना खाली संस्थापक अध्यक्ष महादू हिरणवाळे, कार्याध्यक्ष संभाजी हिरणवाळे, सदाशिव गवळी, दिलीप कुंभार, गोपाळ हिरणवाळे, विशाल गवळी, धीरेंद्र हिरणवाळे आदींनी परिश्रम घेतले.