पुतण्यानेच काढला काकाचा काटा; हात-पाय बांधून जिवंत दरीत फेकले !

#image_title

धुळे : मद्यप्राशन करून सातत्याने त्रास देत असलेल्या काकाचा पुतण्याने मित्राच्या मदतीने खून केल्याची घटना उघड झाली आहे. धुळे स्थानिक गुन्हे शाखेने या गुन्ह्याचा ४८ तासांत छडा लावत संशयित पुतण्या आणि त्याच्या मित्राला अटक केली. याप्रकरणी गुन्ह्यातील वापरलेली कारही जप्त करण्यात आली आहे.

हेही वाचा : 36 वर्षीय महिलेचं 15 वर्षीय मुलावर जडलं प्रेम; लग्नासाठी पळालेही, पण… 

मयत सईद शहा चिराग शहा फकीर (२८, रा. संतोषी माता गल्ली, विसरवाडी, जि. नंदुरबार) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तर, अटक करण्यात आलेल्या संशयितांमध्ये अवेश सलीम शहा (२४, रा. इंदिरानगर, विसरवाडी) आणि सोहेल ऊर्फ बबलू मुबारक शहा (२०, रा. संतोषी माता गल्ली, विसरवाडी) यांचा समावेश आहे.

साक्री तालुक्यातील कोडाईबारी घाटात ७ जानेवारीला सईद शहाचा खून करून त्याचा मृतदेह ४० फूट खोल दरीत फेकण्यात आला होता. पोलिसांनी तपास करत मृत व्यक्तीची ओळख पटवली. सईद शहाला मद्याचे व्यसन असल्याने तो नातेवाईकांशी वाद घालत असे. या कारणावरून पुतण्या अवेशने मित्र सोहेलच्या मदतीने काकाचा खून करण्याचे ठरवले.

आरोपींनी सईद शहाला गॅरेजवर बोलावले आणि स्विफ्ट कारमध्ये बसवून साक्रीच्या कोडाईबारी घाटात नेले. तेथे काळा रूमाल काकाच्या तोंडावर बांधून त्याचा श्वास बंद केला. त्यानंतर हात-पाय दोरीने बांधून जिवंत असतानाच दरीत फेकले  आणि आरोपी घरी परतले.

पोलिसांनी केली जलद कारवाई

धुळे गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने या प्रकरणाचा तपास केला. आरोपी अवेश सलीम शहाला काळा रूमाल वापरण्याची सवय असल्याने त्यावरून पोलिसांना गुन्ह्याचा धागा सापडला. पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत या गुन्ह्याची उकल केली.

श्रीकांत धीवरे (पोलीस अधीक्षक), किशोर काळे (अपर पोलीस अधीक्षक), श्रीराम पवार (गुन्हे शाखा निरीक्षक), अमित माळी (उपनिरीक्षक), जयेश खलाणे (सहाय्यक निरीक्षक), अनिल बागूल (सहाय्यक निरीक्षक), व इतर कर्मचाऱ्यांनी या प्रकरणात मोलाची भूमिका बजावली.