नवी दिल्ली : H3N2 या विषाणूने भारताची चिंता वाढवायाला सुरुवात केली आहे. भारतात सुमारे ३ महिन्यांनंतर ५०० हून अधिक प्रकरणे समोर आली आहेत. तर इन्फ्लूएंझा व्हायरसमुळे भारतात पहिल्या मृत्यूची नोंद देखील झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून ताप, खोकला, सर्दीचे रुग्ण झपाट्याने वाढतांना दिसत आहेत. यामुळे H3N2 या विषाणूपासून बचावासाठी विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.
या विषापासून बचावासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे, वारंवार हात धुवा. कोरोनाप्रमाणेज हा विषाणू देखील फुफ्फुसांवर हल्ला करतो. संसर्ग होताच शरीरात खोकला, सर्दी आणि श्वासोच्छवासाच्या समस्या दिसू लागतात. या दरम्यान, श्वास, थुंकणे आणि शिंकणे हे हवेमध्ये पसरतात. ज्यामुळे संसर्गाचा धोका वाढतो. अशा स्थितीत वारंवार हात धुणे संसर्ग रोखण्यासाठी आणि प्रतिबंध करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.
व्हायरसपासून बचावासाठी या गोष्टी आवश्यक
कोरोना आणि H3N2 व्हायरसपासून बचाव करण्यासाठी साबण आणि पाण्याने आपले हात वारंवार धुवा.
दर काही तासांनी हँड सॅनिटायझर वापरा.
चेहर्याला किंवा नाकाला स्पर्श करणे टाळा. त्यामुळे संसर्ग पसरू शकतो.
गर्दीचे ठिकाणी टाळा आणि मास्क वापरा.
तुम्ही आजारी जर असला तर संसर्ग कमी होईपर्यंत ७ दिवस घरीच थांबा
शिंकताना आणि खोकताना तोंड आणि नाकावर हात किंवा रुमाल ठेवा
हँडशेक आणि मिठी यांसारख्या जवळचा संपर्क टाळा.
तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका.
भरपूर पाणी प्या आणि डॉक्टरांकडून योग्य उपचार घ्या.