Cat : भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाकडून भटक्या कुत्र्यांना पकडून नसबंदी करण्यात येत असते. मात्र आता राज्यातील मांजरांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण आणणे आणि भटक्या मांजरींचा उपद्रव कमी करण्यासाठी सरकराने मोठा निर्णय घेतला आहे.
काय निर्णय?
राज्यातील मांजरांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण आणणे आणि भटक्या मांजरींचा उपद्रव कमी करण्यासाठी सरकराने आता भटक्या मांजरींच्या नसबंदी आणि लसीकरण करण्याचा निर्णय घेतला असून, याबाबत नगरविकास विभागाने शासन परिपत्रक देखील काढले आहे. ज्यात स्थानिक स्वराज्य संस्था यांनी स्वतःहून किंवा AWBI द्वारे मान्यताप्राप्त प्राणी कल्याण संस्थेद्वारे ABC कार्यक्रमासाठी भटक्या मांजरींचे जन्म नियंत्रण आणि लसीकरण योजना राबवण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत.