---Advertisement---

आजचे राशीभविष्य; या राशीच्या लोकांना नोकरीत कामाप्रती ओढ निर्माण होईल

---Advertisement---

तरुण भारत लाईव्ह । ५ मे २०२३। दैनंदिन राशिभविष्य  रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनंदिन  राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते. आजचे १२ राशींचे भविष्य जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

मेष रास 
तुमची पदोन्नती आणि प्रगती होईल.  जोडीदाराकडून सहकार्य लाभेल. व्यापार कारखानदार वर्गात व्यवसायात वाढ होईल. आत्मविश्वासपूर्ण वाटचाल कराल. अनुकुल वातावरण असणार आहे. मनोबल उंचावेल.

वृषभ रास
मानपमान नाट्य घडतील.  जोडीदाराची प्रकृती सांभाळा. तुमचे निर्णय आज चुकण्याची शक्यता आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष करु नका. आर्थिक गुंतवणूक काळजीपूर्वक करा.

मिथुन रास 
वाहन स्थावर संपत्तीचे सौख्य लाभेल. विरोधकावर मात केल्यामुळे आपल्या किर्तीत वाढ होईल. नोकरी व्यापाराचे क्षेत्र विस्तृत होईल. व्यवसायाला चालना देण्याचा प्रयत्न राहील. आरोग्य उत्तम राहणार आहे.

कर्क रास
जोडीदाराच्या महत्वकांक्षा पूर्ण होतील. प्रयत्न केल्यास चांगले यश मिळेल.  प्रेमप्रकरणात यश येईल. लेखनक्षेत्रातील व्यक्तीना नवीन प्रस्ताव मिळतील. प्रगतीकारक दिनमान आहे.

सिंह रास
नोकरीत जबाबदारीत वाढ होईल. आपली कामे यशस्वीपणे पार पाडाल. वरिष्ठांकडून प्रशंसा मिळेल. व्यापारात आर्थिक प्राप्तीत वाढ होईल. नियोजन उत्तम केले तर निर्णायक कामात यश मिळेल.  व्यापारात आकस्मिक धनलाभ होईल. सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घ्याल.

कन्या रास
नोकरीत स्थान बदलाची उत्तम संधी आहे. राजकिय सामाजिक कलाक्षेत्रातील व्यक्तींना योग्य लाभ आणि मानसन्मान प्राप्त होईल. शैक्षणिक कार्यात बौद्धिक कार्यात यश लाभेल. परदेशगमन होईल.

तूळ रास
दैवी पाठबळामुळे अल्प प्रयत्नात मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. कलाकारांसाठी विशेषत: उत्तम दिवस आहे. आर्थिक स्थिती चांगली राहील. व्यवसायिकांना नफ्यात वाढ होईल. गृहसौख्य उत्तम राहील. नवीन योजनाची सुरूवात होईल. परमेश्वरावर श्रद्धा वाढेल.

वृश्चिक रास
आहारात नियमितता ठेवा. बुद्धीचे कामे अधिक करू नका. मानसिक आणि शारिरिक थकवा जाणवेल. चोरी अथवा नुकसानीची घटना घडण्याची शक्यता आहे. कर्ज घेणे आज टाळा. घाई गडबडीतील निर्णय अंगाशी येऊ शकतात. प्रवास नुकसानकारक राहील. प्रवासात दुर्घटनेची शक्यता आहे.

धनु रास
आज आपणास अनुकूल वातावरण निर्माण होईल.  व्यवसायात भरभराटी होण्याची शक्यता आहे. नवनवीन योजना कार्यान्वित करू शकाल. मोठ्या भांवडाकडून उत्तम सहकार्य लाभेल. अचानक लाभ होतील. कौटुंबिक वातावरण चांगले व आनंददायी राहील.

मकर रास
नोकरीत अतिउत्साही आणि अतिरकपणा टाळा. भावनावर नियंत्रण ठेवा. कौटुंबिक समस्याकडे लक्ष राहणार नाही. पत्नीच्या प्रकृतीची चिंता सतावु शकते. आरोग्याबाबतीत खर्चात वाढ होईल.

कुंभ रास
धाडसी निर्णय घ्याल. कौटुंबिक पातळीवर समाधानी राहाल. भाऊबहिणीकडून पाठबळ मिळेल. भांवडाकडून आर्थिक मदतीची शक्यता आहे. सुखात समाधानात वृद्धी करणारा दिवस आहे. स्थावर मालमत्तेत वाढ होईल. सुखकारक दिनमान असेल.

मीन रास
मनोबल आत्मविश्वास वाढेल.  कुंटुंबातील अडचणी दूर होतील. पत्नीशी चांगले संबंध राहतील. आखलेल्या योजना पूर्ण होणार आहेत. शुभवार्ता ऐकायला मिळतील. कौटुंबिक सौख्य समाधानकारक राहील.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment