तरुण भारत लाईव्ह । मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी दोन दिवसांपूर्वी देण्यात आली होती. फेसबुक आणि ट्विटरवर शरद पवार यांनी धमकी मिळाल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे तातडीने पोलीस आयुक्तांना भेटल्या होत्या. त्यांनी पोलीस आयुक्तांना भेटून या प्रकरणी तातडीने कारवाई करण्याची मागणी केली होती. धमकी देणाऱ्याच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहे. पुणे पोलिसांनी धमकी देणाऱ्यास अटक केली आहे. न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडी दिली आहे.
धमकी दिल्याप्रकरणी पुणे शहरातून सागर बर्वे (३४) याला अटक करण्यात आली. त्यानेच दोन दिवसांपूर्वी शरद पवार यांना ‘नर्मदाबाई पटवर्धन’ या फेसबुक पेजवरुन ‘तुमचा लवकरच दाभोलकर करू’ अशी धमकी दिली होती. पोलिसांनी तांत्रिक तपास केल्यानंतर ‘नर्मदाबाई पटवर्धन’ या नावाचे फेसबुक पेज पुण्यातील इंजिनिअर सागर बर्वे चालवत असल्याचे स्पष्ट झाले. सागर बर्वे हा आयटी इंजिनिअर आहे. याप्रकरणी आरोपीला न्यायालयानं 13 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना त्वरीत कारवाईचे आदेश दिले होते.