ऐकावे तर नवलचं; पोलिसांनी केली चक्क ईडी अधिकाऱ्याला अटक

मदुरै : तामिळनाडूत सरकारी कर्मचाऱ्याकडून लाच घेताना अंमलबजावणी संचलनालयाच्या ( ईडी ) अधिकाऱ्याला अटक केली आहे. २० लाख रूपयांची लाच घेताना राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ईडीच्या अधिकाऱ्याला अटक केली. हा अधिकारी एका सरकारी डॉक्टरशी संबंधित प्रकरणात बेहिशोबी मालमत्तेचा तपास करत होता. त्याने डॉक्टराकडे तब्बल १ कोटी रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. या अटकेनंतर तामिळनाडूच्या लालचुचपत प्रतिबंधन विभागाच्या पोलिसांनी थेट मदुरै येथील ईडीच्या उपविभागीय कार्यालयात धाड टाकली आहे. आत्तापर्यंत ईडीचे अधिकारी अनेकांच्या घरी धाड टाकत होते, मात्र आता ईडीच्या कार्यालयात धाड टाकल्याने जोरदार चर्चा होत आहे. अंकित तिवारी असं अटक करण्यात आलेल्या ईडी अधिकाऱ्याचं नाव आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंकित तिवारी अनेकांना ब्लॅकमेल करून कोट्यवधींची लाच घेतल्याचा संशय आहे. तसेच, ईडी अधिकाऱ्यांनाही तिवारीने लाच दिली आहे. तिवारीकडून काही कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी मदुराई आणि चेन्नई येथील ईडीच्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात येण्याची शक्यता आहे. अंकित तिवारीच्या अटकेनंतर जिल्हा दक्षता आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मदुराई येथील ईडीच्या कार्यालयात झाडाझडती घेतली. तसेच, तिवारीच्या निवासस्थानाचीही तपासणी करण्यात आली आहे.

अंकित तिवारी एका वेगवाग कारमधून प्रवास करत होता, त्यावेळी, पोलिसांनी पाठलाग करुन त्याला अटक केली. अंकित तिवारीला रंगेहाथ अटक करण्यासाठी भ्रष्ट्राचार निर्मून पथकाने जाळं टाकलं होतं. स्टेट हायवेवरील एक ड्रॉप ऑफ पाईंटवर अंकित तिवारीने संबंधित प्रकरणातील लाचेचा पहिला हफ्ता म्हणजेच २० लाख रुपये घेतले. त्याचवेळी, भ्रष्टाचार निर्मून पथकाने घटनास्थळी रेड मारली अन् ईडीच्या अधिकाऱ्याला अटक केली. विशेष म्हणजे तामिळनाडूतील राज्य सरकार आणि केंद्रीय तपास यंत्रणां यांच्यात ५ जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस बजावल्याचा वाद सुरू असतानाच अशी कारवाई ईडीच्या अधिकाऱ्यावर करण्यात आली आहे.

दिंडीगुल येथील एका सरकारी कर्मचाऱ्याला अंकित तिवारीने २९ ऑक्टोबरला बेहिशोबी मालमत्तेच्या प्रकरणासंदर्भात संपर्क साधला होता. हे प्रकरण यापूर्वीच बंद करण्यात आलं होतं. पण, याप्रकरणाची पंतप्रधान कार्यालयाने ( पीएमओ ) ईडीला चौकशी करण्याचे निर्देश दिल्याचं अंकितने सरकारी कर्मचाऱ्याला सांगितलं. यानंतर अंकितने कर्मचाऱ्याला पुढील तपासासाठी ३० ऑक्टोबरला मदुराई येथील ईडी कार्यालयात हजर राहण्यासाठी सांगितलं. कर्मचारी ३० ऑक्टोबरला तेथे पोहचल्यावर त्याला तपास बंद करण्यासाठी ३ कोटी रूपयांची लाच मागितली. पण, नंतर ५१ लाख रूपयांची मागणी अंकितने कर्मचाऱ्याकडे केली.