जळगाव | जळगाव शहरात चोरीच्या दुचाकी विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका चोरट्याला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. दीपक प्रेमसिंग सोळंके असं अटक केलेल्या चोरट्याचे नाव असून त्याच्याकडून चोरीच्या पाच दुचाकी जप्त करण्यात आले आहे. दरम्यान त्याच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
याबाबत असे की, पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना 22 डिसेंबर रोजी एक संशयित दुचाकी विक्री करण्यासाठी येणार असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावर, पोलिसांनी अजिंठा चौफुली येथे सापळा रचून दीपक प्रेमसिंग सोळंके याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि जिल्हापेठ पोलीस स्टेशन येथे दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली.
दीपक सोळंके याने जळगाव शहरातून ३, छत्रपती संभाजीनगर येथून १, आणि अडावद येथून १ अशा एकुण ५ दुचाकी चोरल्याची कबुली दिली. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके, पोलीस नायब सुभेदार योगेश बारी, राहुल रगडे, विशाल कोळी, आणि फिरोज तडवी यांनी केली.