Gold Rate In 2024 : नविन वर्षात सोनं खरेदी आवाक्याबाहेर जाणार आहे. कारण, नविन वर्षात अर्थात 2024 वर्षात सोन्याचा भाव 72 हजारांवर जाण्याची शक्यता आहे. तर, दुसरीकडे चांदीचा दर 90,000 प्रति किलो इतका होण्याची देखील शक्याता वर्तवली जात आहे. 2024 नवीन वर्षात सोन महागणार आहे. वर्षाच्या शेवटच्य दिवशी सोनं खरेदीसाठी झुंबड उडाली होती.
31 डिसेंबर हा वर्षाचा शेवटचा दिवस असून सोने खरेदी करण्यासाठी सुवर्ण बाजारात गर्दी पाहायला मिळाली. गेल्या वर्षभरामध्ये सोन्याच्या दरात मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे पाहायला मिळाली असून नवीन वर्षात सोन्याचे दर वाढण्याची शक्यता आहे. यामुळे शेवटचा दिवशी सुवर्ण बाजारात सोनं खरेदीसाठी झुंबड उडाली.
नवीन वर्षात विवाह मुहूर्त जास्त असल्यामुळे सोन्याला मागणी देखील वाढणार आहे. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये गुंतवणुकीची स्थिती उत्तम नसल्याने सोन्यात गुंतवणूक ही वाढले आहे. त्यामुळे 2024 मध्ये सोन्याच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सोने प्रति तोळा 72 हजार तर चांदी प्रति किलो 90 हजार रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आली आहे. त्यामुळे यावर्षी शेवटच्या दिवशी सोने खरेदी साठी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
31 डिसेंबर 2023 या दिवशी सोन्याचे दर हे 63 हजार 400 रुपये प्रती तोळा असून चांदी ही 72 हजार रुपये प्रतिकिलो आहे. 2024 च्या सुरुवातीपासूनच सोने महाग होण्याची शक्यता सुवर्ण व्यवसायिकांनी व्यक्त केली आहे. यामुळे आजच सोने खरेदी करण्यासाठी आल्याची माहिती महिला ग्राहकांनी दिली आहे.