मुंबई : राज्यात सातत्यानं वातावरणात बदल होत आहे. कधी थंडीचा जोर तर कधी पावसाची हजेरी अशी स्थिती निर्माण होत आहे. या बदलत्या वातावरणाचा आरोग्यावरही परिणाम होत आहे. आणखी पुढील दोन ते तीन दिवस राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
उत्तर आणि पूर्व भागातून येणाऱ्या वाऱ्यांमुळं कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यानं तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. परिणामी बदलत्या हवामानाचा शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. पिकांवर विविध रोगांचा परिणाम होत आहे. त्यामुळं राज्यातील शेतकरी चिंतेत आहेत.
रविवारी देखील काही ठिकाणी तुरळक पावसाने हजेरी लावली होती. पावसामुळे राज्यातील किमान तापमानात वाढ होणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे. 29 जानेवारीनंतर महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं गुरुवारी (26 जानेवारी) वर्तवला होता.