नोंदणीकृत दस्तऐवज आता मिळणार ईमेलवर – मुद्रांक जिल्हाधिकारी सुनिल पाटील

तरुण भारत लाईव्ह । जळगाव : दस्तऐवज नोंदणी करतांना दस्त निष्पादीत करुन देणार व घेणार सर्व पक्षकाकारांनी त्यांचे कार्यन्वीत असलेले भ्रमणध्वनी क्रमांक व ईमेल आयडी दस्तांवर टाकावे म्हणजेच त्यावरुन पक्षकाराला आपल्या दस्ताची स्थिती म्हणजे नोंदणीकृत झाला का?, स्कॅन झाला का?, अशा प्रकारे दस्त क्रमांक सह सर्व माहिती मोबाईल वरुन मिळते तसेच ई मेल वर दस्ताची सॉफ्ट कॉफी उपलब्ध होते सदर दस्ताची कॉफी इ मेल असल्यामुळे भविष्यात सुलभ संदर्भासाठी लगेच दस्ताची प्रत आपल्याला मिळते.

तरी जनतेने दस्त नोंदणी करतांना नोंदणी व मुद्रांकविभागाने उपलब्ध करुन दिलेल्या आय- सरीती प्रणालीमध्ये आपले मोबाईल क्रमांक, ईमेल आय.डी. तसेच पत्ते समाविष्ठ करावे ते अचुक असल्याची खात्री करावी असे आवाहन मुद्रांक जिल्हाधिकारी जळगाव सुनिल पाटील यांनी पत्रकान्वये केले आहे.