तरुण भारत लाईव्ह ।श्यामकांत जहागीरदार।
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या Bharat Jodo भारत जोडो यात्रेचा समारोप ३० जानेवारीला जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमधील शेर-ए-काश्मीर स्टेडियमवर झाला. त्याआधी २९ जानेवारीला त्यांनी श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवला. श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवणारे आणि त्यासाठी Bharat Jodo यात्रा काढणारे राहुुल गांधी काही पहिले नेते नाहीत. भाजपाचे ज्येष्ठ नेते डॉ. मुरलीमनोहर जोशी यांनीही २६ जानेवारी १९९२ ला याच लाल चौकात तिरंगा फडकवला होता. राहुल गांधींनी जवळपास ३१ वर्षांनंतर हे काम केले. याआधीही देशातील अनेक पक्षांच्या नेत्यांनी अशा Bharat Jodo यात्रा काढल्या आणि त्याचा त्यांना काही प्रमाणात राजकीय फायदाही झाला. आपल्या देशात अशा Bharat Jodo यात्रांचे एक वेगळे महत्त्व आहे. अशा Bharat Jodo यात्रांना जनतेचा नेहमीच प्रतिसाद मिळतो. Bharat Jodo भाजपाचा देशव्यापी विस्तार करण्यात, तसेच त्याला देशातील प्रमुख राजकीय पक्ष बनवण्यात दोन रथयात्रांचेच योगदान आहे, हे कोणाला नाकारता येणार नाही.
Bharat Jodo भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या सोमनाथ ते अयोध्या या रथयात्रेने देशात इतिहास घडवला आणि देशाचा राजकीय इतिहास बदललासुद्धा. डॉ. अडवाणी यांनी तर एकापेक्षा जास्त रथयात्रा काढल्या. आपल्या देशातील काही नेत्यांनी वाहनातून यात्रा पूर्ण केल्या, तर काही नेत्यांनी पदयात्रा काढल्या. Bharat Jodo देशव्यापी पदयात्रा करणा-यांमध्ये महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांचा समावेश होता. महात्मा गांधींनी स्वातंत्र्य मिळण्याआधी अनेक पदयात्रा केल्या. त्यातील दांडीयात्रा ही अतिशय प्रसिद्ध आहे. ‘उचललेस तू मीठ मूठभर साम्राज्याचा खचला पाया,’ हे दांडी यात्रेतील गीत तेव्हा अतिशय गाजले होते. महात्मा गांधींनी मात्र कोणताही राजकीय स्वार्थ डोळ्यासमोर ठेवत पदयात्रा काढली नव्हती, तर त्यांच्या पदयात्रा इंग्रजी राजवटीविरुद्ध आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी होत्या. Bharat Jodo दुसरी गाजलेली पदयात्रा चंद्रशेखर यांची. १९८३ मध्ये चंद्रशेखर यांनी कन्याकुमारीहून आपल्या पदयात्रेला प्रारंभ केला. सहा महिन्यांनंतर त्यांची पदयात्रा दिल्लीतील राजघाटवर पोहोचली. या पदयात्रेचा चंद्रशेखर यांना कोणताही राजकीय फायदा झाला नाही.
Bharat Jodo चंद्रशेखर नंतर पंतप्रधान झाले, पण ते वेगळ्या राजकीय परिस्थितीमुळे. त्याचा त्यांच्या पदयात्रेशी दूरदूरपर्यंत कोणताच संबंध नव्हता. राजीव गांधी पंतप्रधान असताना, त्यांच्या सूचनेवरून काँग्रेसने संंदेशयात्रा काढली होती. मुंबईवरून सुरू झालेल्या या संदेशयात्रेचा समारोप तीन महिन्यांनी दिल्लीच्या रामलीला मैदानावर झाला. पदयात्रेचा खèया अर्थाने राजकीय फायदा मिळाला तो आंध्रप्रदेशातील काँग्रेसचे नेते वायएस राजशेखर रेड्डी यांना. Bharat Jodo रेड्डी यांच्या या यात्रेने काँग्रेसचा राज्यातील सत्तेत परतण्याचा मार्ग प्रशस्त झाला. त्यानंतर त्यांचाच मुलगा जगनमोहन रेड्डी यांनीही काँग्रेसमधून बाहेर पडत प्रजासंकल्प यात्रा काढली. राजशेखर रेड्डी यांच्या यात्रेमुळे आंध्रप्रदेशमध्ये काँग्रेस सत्तेवर आली, तर जगनमोहन रेड्डी यांच्या यात्रेमुळे काँग्रेसला राज्यातील आपली सत्ता गमवावी लागली. Bharat Jodo त्यामुळे आता राहुल गांधींच्या पदयात्रेमुळे स्वत: राहुल गांधींना आणि त्यांच्या काँग्रेस पक्षाला राजकीय फायदा मिळेल का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
राहुल गांधींच्या पदयात्रेचा काँग्रेसला राजकीय फायदा मिळेल की नाही, हे समजण्यासाठी काही काळ जाऊ द्यावा लागणार आहे. Bharat Jodo पण या पदयात्रेने काही गोष्टी साध्य झाल्या आहेत. पहिली म्हणजे या पदयात्रेने काही प्रमाणात राहुल गांधींची देशातील प्रतिमा बदलली. पदयात्रेच्या आधी देशभर राहुल गांधींची प्रतिमा ‘पप्पू’ अशी तयार झाली होती, यासाठी ते स्वत:च जबाबदार आहेत. राहुल गांधींनी आपल्या वागणुकीने आपल्या ‘पप्पू’पणाला हातभार लावला. राहुल गांधींची ही ‘पप्पू’पणाची प्रतिमा या पदयात्रेने पूर्णपणे नाही, तर काही प्रमाणात पुसली गेली आहे. Bharat Jodo दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राहुल गांधींमध्ये काही प्रमाणात गांभीर्य दिसू लागले आहे. आतापर्यंत ते राजकारणाला घेऊन फारसे गंभीर असल्याचे कधी दिसले नाहीत. राजकारण हा २४ बाय ७ करायचा उद्योग आहे. Bharat Jodo मात्र, राहुल गांधींनी राजकारणात स्वत:ला झोकून दिल्याचे कधी दिसले नाही. राजकारणाला त्यांनी नेहमीच दुय्यम स्थान दिले. आता मात्र ते बदलल्यासारखे वाटत आहेत.
Bharat Jodo पदयात्रेची तिसरी महत्त्वाची उपलब्धी म्हणजे यातून राहुल गांधींचा फिजिकल फिटनेस देशवासीयांसमोर आला आहे. दररोज २५ ते ३० किमी याप्रमाणे जवळपास चार हजार किमीचे अंतर साडेचार महिन्यांत पायी चालून पूर्ण करणे हे तसे सोपे काम नाही. मात्र, ते त्यांनी कोणताही खंड न पाडता पूर्ण केले, हे कौतुकास्पद आहे. Bharat Jodo यात्रेत राहुल गांधींच्या गतीने चालताना काँग्रेसच्या अनेक नेत्यांच्या तोंडाला फेस आला होता. काँग्रेस पक्षाच्या दृष्टीने पदयात्रेची सर्वांत महत्त्वाची उपलब्धी म्हणजे काँग्रेस पक्षाने या यात्रेचे केलेले नियोजन आणि यशस्वी अंमलबजावणी. Bharat Jodo आतापर्यंत या कामात भाजपाच्या नेत्यांचा आणि कार्यकत्र्यांचा हातखंडा समजला जात होता. मात्र, यात आपणही मागे नसल्याचे काँग्रेसने दाखवून दिले आहे.
आता सर्वांना पडलेला मोठा प्रश्न म्हणजे या पदयात्रेचा राजकीय फायदा काँग्रेसला उचलता येईल का, तसेच या यात्रेचा राजकीय फायदा उचलता येईल, अशी संघटनात्मक रचना संपूर्ण देशात काँग्रेस पक्षाजवळ आहे का, या प्रश्नाचे उत्तर मात्र नकारार्थीच आहे. Bharat Jodo मुळात पदयात्रा सुरू असताना गुजरात आणि हिमाचल प्रदेश या दोन राज्यांत विधानसभा निवडणुका झाल्या. यातील गुजरातमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाला. हिमाचल प्रदेशात काँग्रेसला सत्ता मिळाली असली तरी त्याचा राहुल गांधींच्या पदयात्रेशी दूरदूरपर्यंत काही संंबंध नव्हता. येत्या काही महिन्यांत राजस्थान आणि छत्तीसगड या दोन काँग्रेसशासित राज्यांत विधानसभा निवडणूक आहे. Bharat Jodo पण या दोन्ही राज्यांत पदयात्रेचा जेवढा फायदा मिळेल, त्यापेक्षा जास्त नुकसान काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीमुळे होणार आहे.
Bharat Jodo राजस्थानमध्ये तर काँग्रेसला पराभूत करण्यासाठी भाजपाला काही करण्याची गरजच नाही. हे काम तेथे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांचे गटच एक-दुस-याविरुद्ध करणार आहेत. Bharat Jodo थोडी फार अशीच परिस्थिती छत्तीसगडमध्येही आहे. राष्ट्रीय राजकारणात राहुल गांधी गेल्या अनेक वर्षांपासून असले तरी अन्य राजकीय पक्षांमध्ये त्यांना पाहिजे तेवढी स्वीकारार्यता तसेच मान्यता आतापर्यंत मिळालेली नाही. त्यामुळे कोणताच राजकीय पक्ष, अगदी काँग्रेसचे मित्रपक्षही राहुल गांधींना राष्ट्रीय नेतृत्व द्यायला आणि राष्ट्रीय नेते समजायला तयार नाही. Bharat Jodo याचा अनुभव भारत जोडो यात्रेच्या समारोपाच्या वेळी आला. यात्रेच्या समारोपीय कार्यक्रमात सहभागी होण्याचे निमंत्रण काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे यांनी देशातील २१ राजकीय पक्षांच्या नेत्यांना दिले होते. Bharat Jodo मात्र, या २१ पैकी फक्त आठ ते दहा राजकीय पक्षांचे नेते यात्रेच्या समारोप समारंभाला उपस्थित राहिले.
विरोधी पक्षात आधीच तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी, आपचे अरविंद केजरीवाल आणि भारत राष्ट्र समितीचे चंद्रशेखर राव यांना पंतप्रधानपदाची स्वप्ने पडू लागली आहेत. Bharat Jodo अशा परिस्थितीत राहुल गांधींच्या या कार्यक्रमात उपस्थित राहून पंतप्रधानपदाचा आणखी एक दावेदार का वाढवायचा, असा विचार विरोधी पक्षांनी केला असण्याची शक्यता जास्त आहे. काँग्रेसचा मित्रपक्ष म्हणवल्या जाणा-या राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवणारी होती. Bharat Jodo विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे तसेच शिवसेनेचे संजय राऊत या यात्रेत सहभागी झाले होते. नॅशनल कॉन्फरन्सचे डॉ. फारुक अब्दुल्ला, पीडीपीच्या मेहबुबा मुफ्ती हे काश्मीरमधील राजकीय पक्षांचे नेते उपस्थित होते. अन्य जे पक्ष उपस्थित होते, त्यांचा देशात वा स्वत:च्या राज्यातही फारसा प्रभाव नाही. Bharat Jodo अशा पक्षांत केरळ काँग्रेस, आरएसपी, झारखंड मुक्ती मोर्चा, आययुएमएल आणि विदुथलाई चिरुथिगल काची (व्हीएसके) या पक्षांचा समावेश होता.
Bharat Jodo बिहारमधील राजद RJD आणि जदयू JDU या पक्षांचे प्रतिनिधीही या समारोप समारंभाला उपस्थित नव्हते. SP सपा आणि बसपा BSP या उत्तरप्रदेशातील दोन प्रमुख पक्षांनी तर यात्रा उत्तरप्रदेशात असतानाच बहिष्कार घातला होता. काही पक्ष बोलावून आले नाही, तर काही पक्षांना काँग्रेसने यात्रेच्या समारोप समारंभात सहभागी होण्याचे निमंत्रणच दिले नव्हते. Bharat Jodo यात अरविंद केजरीवाल यांचा आप AAP, जगनमोहन रेड्डी यांचा वायएसआर काँग्रेस YSR Congress, नवीन पटनायक यांचा बिजू जनता दल, असदुद्दिन ओवैसी यांचा एआयएमआयएम AIMIM , चंद्रशेखर राव यांचा भारत राष्ट्र समिती BRS यांचा समावेश होता. यातील काही पक्षांना भाजपाचे मित्रपक्ष म्हणून, तर काही पक्षांना, ते संबंधित राज्यात काँग्रेसचे विरोधक असल्यामुळे निमंत्रण देण्यात आले नव्हते. Bharat Jodo श्रीनगरमधील खराब हवामानामुळे विमान रद्द झाल्यामुळे आम्हाला समारोप समारंभात सहभागी होता आले नाही, असे सांगण्याची संधी या राजकीय पक्षांच्या नेत्यांना असली तर खराब हवामानाचा फायदा घेऊनच या पक्षाच्या नेत्यांनी समारोप समारंभात सहभागी होण्याचे टाळले, असे म्हणणे जास्त योग्य ठरेल.Bharat Jodo