पहिल्याच पावसात रस्त्याचा भराव गेला वाहून; अखेर वाहतूक झाली सुरळीत

पाचोरा : तालुक्यातील सांगवी गावाजवळील नवीन पुलाचे काम चालू आहे. मात्र, या पुलाचा बायपास भराव हा पावसामुळे वाहून गेल्याने अचानक बस सेवा रद्द करण्यात आली. परिणामी एन रात्रीच्या वेळी हाल होत असल्याने प्रवाशांनी काँग्रेस तालुकाध्यक्षांना सांगिलते. त्यांनी तात्काळ दाखल घेत, बस सोडण्यास भाग पाडले. दरम्यान,  पुलाचा वापर पंधरा दिवसात न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला.

तालुक्यातील पाचोरा ते लोहारा रस्त्यावर नाईक नगर गावाच्या पुढे सार्वजनिक बांधकाम विभागाचे पुलाचे काम संत गतीने सुरू आहे यातच पुलासाठी जो अंदाजपत्रकामध्ये बायपास रस्ता केलेला होता तो पावसाळ्याच्या पहिल्याच महिन्यात सदर बायपास रस्त्याचे काम खराब झाल्याने या रस्त्यावरून वाहतूक करणे जिकरीची झाले आहे त्यामुळे कुऱ्हाड, लोहारा, कळमसरा कासमपुरा, या गावांना जाणे ग्रामस्थांना अवघड झाले आहे सदर पुलाचे काम झाले नसल्याने काल रात्रीच्या सुमारास कुऱ्हाड सांगवी गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांचे अतोनात हाल झाले यावेळी बस स्थानकावर जवळपास ६० ते ७०प्रवासी आपापल्या गावी जाण्यासाठी बसून होते यावेळी गोंदेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते समाधान पाटील यांनी काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांना प्रवाशांचे हाल होत असल्याबद्दल तातडीने बस स्थानकावर या अशी माहिती दिली असता सचिन सोमवंशी तात्काळ बस स्थानकावर दाखल झाले यावेळी लोहारा, कुर्‍हाड, सांगवी येथील प्रवाशांची चर्चा करून बस स्थानक प्रमुख प्रकाश पाटील सह इतर अधिकाऱ्यांशी चर्चा केली व तात्काळ बस सोडण्याची आग्रही मागणी केली असता पाचोरा वरखेडी लोहारा अशी एक बस सोडण्यात आली तर पाचोरा ते सांगवी पर्यंत एक बस पाठवण्यात आली यावेळी सदर पुलाबाबत काँग्रेस अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी तात्काळ सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी दीपक पाटील यांच्याशी संपर्क साधून येत्या पंधरा दिवसात पुलाची रहदारी सुरू न झाल्यास काँग्रेस पक्षाकडून पुलाच्या जागेवरच आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. प्रवाशांना बसची व्यवस्था झाल्यामुळे रात्री नऊ वाजता सर्व प्रवासी महिला, पुरुष, वयोवृद्ध यांनी आपापल्या गावाकडे रवाना झाले वयोवृद्ध लोकांनी काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांना भरभरून आशीर्वाद दिले.

वाहतूक सुरळीत- पहिल्याच पावसात भराव वाहून गेल्याची माहिती मिळताच दखल घेऊन कर्मचार्यांसह जेसीबी व साहित्य सह घटनास्थळी धाव घेऊन तत्काळ वाहून गेलेल्या रस्त्याचे काम करून वाहतूक सुरळीत करण्यात आली.
डी. एम.पाटील
सार्वजनिक बांधकाम उपविभागीय अभियंता, पाचोरा.