त्वचा काळवंडली आहे? मग फोल्लो करा ‘या’ टिप्स

तरुण भारत लाईव्ह । २५ जानेवारी २०२३। आपण सुंदर दिसावं हे प्रत्येकाला वाटत असत. पण व्यस्त जीवनशैलीमध्ये स्वतःकडे लक्ष द्यायला जमत नाही. त्वचेसंबंधित काही रोग उदभवत असतात त्वचा कोरडी पडणे, काळवंडणे, सुरकुत्या होणे, मग अशावेळी घरातल्या पदार्थांचा वापर करणं अधिक सोपं ठरतं आणि यासाठी उत्तम मार्ग म्हणजे घरातील तांदळाचं पीठ. तांदळाचं पीठ हा सर्वोत्तम उपाय आहे त्वचेची चमक वाढवण्यासाठी. तांदळाच्या पीठाचे काही फेसपॅक तुम्ही वापरू शकतात. तांदळाच्या पीठाचे फेसपॅक कसे बनवतात हे जाणून घ्या तरुण भारताच्या माध्यमातून.

तांदळाचे पीठ हे डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते आणि ज्यांना डार्क सर्कल्स ची समस्या असेल त्यांनी तांदळाच्या पीठाचे फेसपॅक वापरणे योग्य ठरेल डार्क सर्कल्स साठी तांदळाच्या पीठाचे फेसपॅक तयार करताना एक चमचा तांदळाचे पीठ घेऊन त्यामध्ये एक छोटा चमचा मध घालावे हे फेसपॅक १५ मिनिटे चेहऱ्यावर ठेवून थंड पाण्याने चेहरा धुवावा. हा फेसपॅक आठवड्यातून दोन वेळा लावल्याने डार्क सर्कल्स ची समस्या कमी होण्यास मदत होईल.

काहींना त्वचेवर सुरकुत्या असल्यास त्यांनी तांदळाच्या पीठामध्ये २ चमचे मध आणि २ चमचे क्चचे दूध घालून हे मिश्रण १० मिनिटे चेहऱ्यावर ठेवून चेहरा थंड पाण्याने धुवावा. हा फेसपॅक आठवड्यातून तीन वेळा लावावा. ज्यांना त्वचा काळी पडण्याची समस्या असेल त्यांनी तांदळाच्या पीठामध्ये चिमूटभर हळद आणि दूध मिसळून हा फेसपॅक चेहऱ्यावर लावावा. हा फेसपॅक रोज वापरला तरी हरकत नाही.