बाळंतीणीला रात्री दोन वाजता रक्‍ताची गरज पडली, सामाजिक कार्यकर्त्यानं वाचविले माता अन्‌ बाळाचे प्राण!

जळगाव : खासगी रूग्‍णालयात महिला बाळंतपणासाठी दाखल झाली होती. परंतु, या महिलेला रक्ताची आवश्यकता भासली. ओ निगेटीव्‍ह रक्‍तगट असल्‍याने रात्री दीडच्‍या सुमारास रक्‍त कुठून आणायचे असा प्रश्‍नच उभा राहिला. मात्र रात्री दोन वाजता एका सामाजिक कार्यकर्त्याने महिलेला रक्तदान करत तिचे प्राण वाचविले आहे. इतकेच नाही तर वेळेवर रक्त मिळाल्याने या महिलेने बाळालाही जन्म दिला. आता या रक्तदात्यांचे कौतुक होत आहे. अर्थात रक्तदान हे श्रेष्ठदान असल्‍याचीच प्रचिती पाचोरा येथे मध्‍यरात्रीनंतर आली.

भडगाव तालुक्यातील पिचर्डे येथील छाया गायकवाड असे जीवनदान मिळालेल्या महिलेचे नाव आहे. तर सुनील माळी असे रक्‍तदान केलेल्या सामाजिक कार्यकर्त्याचं नाव आहे. हॉस्पिटलमध्ये बाळंतपणासाठी दाखल झालेल्या महिलेला रात्री दोन वाजता रक्तदान करुन प्राण वाचविले प्राण या रक्तदात्यांचे कौतुक होत आहे.

दिवसभर कधीही रक्त मिळणे हे सहज शक्य आहे. मात्र दुर्मिळ रक्तगट ओ निगेटिव्ह आणि तेही रात्रीच्या सुमारास मिळेल; याची कधीच श्वासती नसते. अशात बाळंतपणासाठी दाखल महिलेला या रक्‍ताची गरज भासली. या महिला रुग्णासोबत कुणीही नाही; अशात तिला रक्ताची गरज पडली. त्‍यावेळी हॉस्पिटल प्रशासनाने कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्याशी रात्री दिड वाजेच्या सुमारास संपर्क केला.

सोमवंशी हे तातडीने हॉस्पिटलमध्ये उपस्थित होवून त्यांनी त्यांच्या संपर्कातील सामाजिक कार्यकर्ते सुनिल माळी यांना रक्‍तदानासाठी आग्रह केला. यानंतर माळी यांनी रक्तदान केले. रक्तदात्यांच्या रक्ताने छाया गायकवाड यांचे प्राण डॉ. वैभव सुर्यवंशी वाचवु शकले आणि एका बाळाला तिने जन्म दिला. आता या रक्तदात्यांचे कौतुक होत आहे. अर्थात रक्तदान हे श्रेष्ठदान असल्‍याचीच प्रचिती पाचोरा येथे मध्‍यरात्रीनंतर आली.