एकच मिशन, जुनी पेन्शन : तासाभरात संप मागे घेण्याची शक्यता

मुंबईः राज्यातील शिक्षक आणि सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी निमशासकीय व शासकीय कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारले आहे. संपाचा आजचा सातवा दिवस असून आज मुख्यमंत्र्यांनी संपकऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये यशस्वी तोडगा निघाल्याची माहिती आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपकऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये यशस्वी तोडगा निघाल्याची माहिती आहे. संप मागे घेण्याबाबत मसुदा तयार असल्याचं वृत्त आहे. त्यामुळे तासाभरात संप मागे घेण्याची घोषणा होऊ शकते. ‘साम टीव्ही’ने यासंदर्भात वृत्त दिले आहे. तोडग्याबाबतचा मसूदा संपकऱ्यांना मान्य होताच घोषणा होऊ शकते.

दरम्यान, राज्यातील शिक्षक आणि सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी निमशासकीय व शासकीय कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारले आहे. परिणामी नागरिकांच्या शासकीय कामांमध्ये अपूर्ण विराम, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान, तसेच गारपीट, अवकाळी पावसाने शेतमालांचं प्रचंड नुकसान झालं आहे. शेतकरी अक्षरशः शेतकरी आडवा झालेला असताना पंचनामे करायला कुणी नाहीये.