चाळीसगाव : अवैध गुटख्याची वाहतूक करणारा कंटेनर चाळीसगाव उपविभागीय आधिकारी अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतुक शाखेच्या पथकाने आज गुरुवारी पकडला. यात ६० लाखांचा गुटखा व २० लांखाचा कंटेनर असा एकूण ८० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी चाळीसगाव पोलीसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव-भडगाव रोडवर बस स्थानकाजवळ बेकायदेशीरपणे गुटख्याची वाहतुक करणारा कंटेनर उपविभागीय आधिकारी अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतुक शाखेच्या पथकाने आज गुरुवारी पकडला. यात ६० लाखांचा गुटखा व २० लांखाचा कंटेनर असा एकूण ८० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी चाळीसगाव पोलीसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. वाहतुक शाखेचे सहपो.नि.तुषार देवरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.