तरुण भारत लाईव्ह ।१८ जानेवारी २०२३। दहावी आणि बारावी बोर्डच्या परीक्षा जवळ येत आहेत. शैक्षणिक वर्षापासून दहावीच्या अभ्यासक्रमाबरोबरच परीक्षा पद्धतीमध्येही आमूलाग्र बदल करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांकडे खूप कमी दिवस राहिले असून या कालावधीत नेमका कसा अभ्यास करावा आणि वेळेचं नियोजन कस करावं, त्यासोबतच पालकांनी विद्यार्थ्यांना कशाप्रकारे मार्गदर्शन करावं, याबद्दल आपण जाणून घेऊया.
बारावीच्या परीक्षा फेब्रुवारी तर दहावीच्या परीक्षा मार्चपासून सुरु होत आहे. विद्यार्थ्यांकडे खूप कमी दिवस राहिले असून या कालावधीत नेमका कसा अभ्यास करावा त्याचबरोबर वेळेचं नियोजन करणे हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. सगळ्यात पहिले विद्यार्थांनी परीक्षेचे टेन्शन घेऊ नये. जर तुम्ही परीक्षेचं टेन्शन घेऊन अभ्यास केलात तर तुम्ही जो अभ्यास केला आहे तो पूर्णपणे विसरून जाणार म्हणून अभ्यास करताना टेन्शन फ्री होऊन अभ्यास करावा. विद्यार्थयांनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा फक्त गुण चांगले मिळावे यासाठी अभ्यास करू नका, अभ्यास यासाठी करा कि आपल्याला या स्पर्धात्मक जगात टिकायचं आहे आपल्याला आपल्या आयुष्यात चांगलं काहीतरी करून दाखवायचं आहे यासाठी तुम्ही अभ्यास करा.
आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे रट्टा मारून अभ्यास करू नका, तुम्ही जर रट्टा मारून अभ्यास केलात तर परीक्षेत तुम्हाला काही आठवणार नाही. संकल्पना समजून घेऊन अभ्यास करावा तसेच खोलवर जाऊन अभ्यास करावा जेणेकरून तुम्ही जो अभ्यास केला आहे तो तुमच्या लक्षात राहील आणि परीक्षेत तुम्हाला लिहिता येईल. परीक्षेचा कालावधी हा तीन तासांचा असतो. तीन तास पेपर लिहण्यासाठी तुम्हाला लिहण्याची जास्त सराव करावा लागेल. लिहिण्याचा सराव व्हावा यासाठी तुम्ही मागच्या वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडवू शकता. यामध्ये तुम्हाला हे समजण्यास मदत होईल कि आपण वेळेंत पूर्ण पेपर सोडवत आहोत का? म्हणजे तुमचा परीक्षेत गोंधळ होणार नाही.
या कालावधी मध्ये तुम्ही तुमच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष दिले पाहिजे. तुम्ही तुमच्या आहारात हिरव्या पाले भाज्या आणि ताजे अन्न खावे. संद्याकाळी भूक लागली तर ताजी फळे खावीत म्हणजे तुमचे आरोग्य चांगले राहील. रात्री खूप वेळ जागून अभ्यास करू नये. पुरेशी झोप घेणे हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे.
पालकांनी काय मार्गदर्शन करावे?
पालकांनी विद्यार्थ्यांवर परीक्षेचे दडपण देऊ नये. थोडावेळ रिलॅक्स मिळावा यासाठी विद्यार्थाना मोबाईल किंवा टीव्ही पाहू द्यावा. पालकांनी आपल्या मुलांना वेळापत्रक करून द्यावं की कुठल्या वेळेत काय करायला पाहिजे. नाहीतर एक तास बाहेर मोकळ्या हवेत फिरायला जावे, यामुळे तुम्हला ताजेतवाने वाटेल. त्यामुळे अभ्यास करण्यात मन लागेल.