शहादा : शासकीय कार्यालयांमार्फत दिल्या जाणार्या कागदपत्रांवर बनावट शिक्के मारुन शासनाची फसवणूक करण्यात आल्याची घटना शहाद्यात उघडीस आली आहे. याप्रकरणी पोलीसांनी एका जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून न्यायालयाने तिघांना 23 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलीस सुत्रानुसार, शहादा शहरात अनेक दिवसांपासून दिव्यांगांना महसूल, ग्रामविकास, परिवहन महामंडळाकडून देण्यात येणार्या सवलतींच्या प्रमाणपत्रांवर अवैधरितया बोगस शिक्के मारुन देणारी टोळी कार्यरत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार शहादा येथील पोलीस पथकाने शहरात तपास करुन शहरातील बसस्थानक परिसरात असलेल्या एका कटलरीच्या दुकान तसेच कापडाच्या दुकानात व घरी धाडी टाकल्या. यात कापडाच्या दुकानात अनेक बनावट रबरी स्टॅम्प, खोटया पासेस आढळून आल्या.
शहादा पोलीसांनी त्यांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता दि. 23 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. महेंद्र वाघ हे आमलाड ता.तळोदा येथील जिल्हा परिषद शाळेत उपशिक्षक म्हणून कार्यरत असल्याचे समजते. तसेच सुनील चौधरी याची प्रिंटींग प्रेस आहे.