---Advertisement---

IPL 2025 : आजपासून आयपीएलचा थरार, पण सामन्यापूर्वीच ‘बॅड न्यूज’

---Advertisement---

कोलकाता : जगातील सर्वाधिक लोकप्रिय इंडियन प्रीमियर लीगच्या १८व्या आवृत्तीला आज, शनिवारपासून प्रारंभ होत आहे. सुमारे दोन महिने चालणाऱ्या या आयपीएलचा सलामीचा सामना आज, शनिवारी ईडन गार्डन्स स्टेडियमवर सायंकाळी ७.३० वाजतापासून गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळला जाणार आहे.

दरम्यान, रात्री ९ ते १० दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता शक्यता वर्तविण्यात आली असून, तापमान सुमारे २३ ते २५ अंश सेल्सिअस असू शकते, तर वाऱ्याचा वेग ताशी २२ किलोमीटर असेल. त्यामुळे जर पाऊस पडला तर क्रीडारसिकांचा भ्रमनिरास होऊ शकतो.

सलामीच्या सामन्यापूर्वी अभिनेत्री दिशा पटाणी व गायिका श्रेया घोषाल यांच्या नृत्य संगीताच्या कार्यक्रमाने आयपीएलच्या क्रिकेट उत्सवाला सुरुवात होणार आहे.

दहा संघांचा समावेश असलेल्या आयपीएलमध्ये विविध ठिकाणी एकूण ७४ सामने खेळले जाणार असून स्पर्धेचा अंतिम सामना २५ मे रोजी खेळला जाणार आहे. मुंबई इंडियन्स व चेन्नई सुपर किंग्जने आतापर्यंत प्रत्येकी पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे.

यंदाच्या आयपीएलमध्ये अनेक संघांचे कर्णधार बदलण्यात आले असून या लढतीतील दोन्ही संघांचे नवीन कर्णधार असून केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणे आहे, तर आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदार आहे.

नवीन कर्णधार, नवीन नियम असले तरी क्रिकेटप्रेमींचा उत्साह कायम आहे. किंबहुना तो अधिक वाढला आहे. आजच्या सामन्यात आरसीबीच्या विराट कोहली, फिल सॉल्ट, भुवनेश्वर कुमार व विदर्भाचा यष्टिरक्षक जितेश शर्मा, तसेच केकेआरच्या सुनील नरेन, क्लिंटन डिकॉक, रिकू सिंग, व्यंकटेश अय्यर व वरुण चक्रवर्तीच्या कामगिरीकडे प्रेक्षकांचे लक्ष असणार आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment