---Advertisement---

Jalgaon News : वाहतूक शाखेला उशिरा सुचले शहाणपण, शिव कॉलनी स्टॉपवर सिग्नल यंत्रणा प्रगतीपथावर

---Advertisement---

जळगाव : जळगाव शहराची लोकसंख्या ही पाच लाखाहून अधिक पोहचली आहे. लोकसंख्येप्रमाणेच वाहनांची संख्या आणि त्यामुळे निर्माण होणार रहदारीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. शहरात लहान-मोठे अपघांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच नुकताच शिव कॉलनी स्टॉपवर झालेल्या भीषण अपघातात एकाला जीव गमवावा लागला होता. या ठिकाणी अपघात नित्याचे झाले आहे. ही समस्या लक्षात घेता उशिरा का होईना शहर वाहतूक शाखा जागी होत आता या शिव कॉलनी स्टॉपवर सिग्नल यंत्रणेचे काम सुरु करण्यात आले आहे.

जळगाव शहरातून जाणाऱ्या महामार्गावर दररोज लहान-मोठे अपघात होत आहेत. दरम्यान, शहरातील कालिकामाता मंदिर चौकात बुधवार, २५ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ७.१५ वाजता एका भरधाव डंपरने १३ वर्षीय बालिकेला चिरडल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर संतप्त जमावाने उभ्या डंपरला पेटवून दिल्याचा प्रकार घडला होता.

हेही वाचा : ‘घरी ये, कोणी नाहीय…’, सख्ख्या बहिणींनी व्यापाऱ्याला बोलावलं अन्; वाचा नेमकं काय घडलं?

त्यानंतर बुधवारी (दि.०५ मार्च २०२५ ) रोजी रात्री पुन्हा एका दुचाकीस्वाराला आपल्या जीव गमवावा लागल्याची घटना शिव कॉलनी स्टॉपवर घडली होती. भरधाव कंटेनरने जबर धडक देऊन दुचाकीस्वाराला सुमारे ६० फुटांपर्यंत फरफटत नेले होते. या अपघातानंतर संतप्त झालेल्या हजारोंच्या जमावाने रस्त्यावर उतरत सुमारे दीड तास रास्ता रोको आंदोलनदेखील केले होते. तसेच आकाशवाणी चौकातील सर्कलमुळे आतापर्यंत अनेकांचे प्राण गेल्याचे समोर आले आहेत.

शिव कॉलनी स्टॉपवर अपघात नित्याचे

शिव कॉलनी स्टॉपवर अपघात हे नित्याचे झाले असून, या स्टॉपवर दिवसभर ट्राफिक असते तर रात्री ८ ते ११.३० वाजेपर्यंत यात अधिक भर पडते. मात्र, स्टॉपवर सिग्नल यंत्रणा कार्यवित नसल्याने समोरून येणारे वाहने भरधाव वेगात येत असतात. यामुळे आतापर्यंत अनेकांना जीव गमवावे लागले आहेत. असे असतानाही संबंधित विभागाकडून दखल घेतली जात नव्हती. मात्र, आता उशिरा का होईना शहर वाहतूक शाखा जागी होत, शिव कॉलनी स्टॉपवर सिग्नल यंत्रणेचे काम सुरु करण्यात आले आहेत. त्यामुळे आता अपघाताचे प्रमाण कमी होण्यात मदत होईल.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment