ऑस्कर विजेत्या ‘पॅरासाईट’ सिनेमातील लोकप्रिय अभिनेत्याचं दुःखद निधन

ऑस्कर-विजेता चित्रपट “पॅरासाइट” मधील अभिनेता ली सन-क्यूनचं निधन झालंय. दक्षिण कोरियाच्या कार्यालयाने ही दुःखद बातमी सर्वांना दिली आहे.

पोलिस अधिकाऱ्यांनी बुधवारी एका अज्ञात ठिकाणी बेशुद्धअवस्थेत असलेल्या अभिनेत्याला शोधून काढले

योनहाप वृत्तसंस्थेने दिलेल्या अहवालानुसार, दक्षिण कोरियाच्या माध्यमांनी ली सोल पार्कींगमधील कारमध्ये मृतावस्थेत आढळल्याचे वृत्त दिले आहे.

लीने बुधवारी सुसाईड नोट लिहून घर सोडले. तेव्हापासून पोलीस त्याचा शोध घेत होते.