---Advertisement---

मंगळाचे भ्रमण ‘या’ चार राशींसाठी शुभ आणि फलदायी ठरणार

---Advertisement---

तरुण भारत लाईव्ह । १३ एप्रिल २०२३। ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहाचे स्वतःचे महत्त्व आहे. मंगळाला ग्रहांचा सेनापती म्हणतात. 13 मार्च 2023 रोजी मंगळचा मिथुन राशीत प्रवेश झाला असून 9 मे पर्यंत या राशीत राहणार आहे. मंगळाचे भ्रमण काही राशींसाठी शुभ आणि फलदायी असणार आहे. मंगळाचे हे संक्रमण कोणत्या राशींसाठी कसा योग घेऊन येणार आहे हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

कर्क रास 
या राशीच्या लोकांना मंगळ संक्रमणाचा शुभ प्रभाव मिळेल. तुमच्या राशीत मंगळाचे भ्रमण होणार आहे. जर कोणी नवीन योजनेवर काम करत असेल तर त्याला नक्कीच यश मिळेल. कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. वादविवादापासून स्वतःला दूर ठेवा.

कुंभ रास 
ज्योतिष शास्त्रानुसार कुंभ राशीच्या लोकांना मंगळ संक्रमणाचे शुभ परिणाम मिळतील. या दरम्यान या राशीच्या लोकांचे जुनी शत्रूता संपेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल. या काळात खर्च वाढण्याची शक्यता आहे.

धनु रास 
या राशीच्या लोकांसाठी मंगळ संक्रमण देखील शुभ ठरेल. जुना पैसा अडकला असेल तर तो या कालावधीत परत मिळू शकतो. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. या दरम्यान, रस्त्यावर वाहन चालवताना काळजी घ्या.

मीन रास 
ज्योतिष शास्त्रानुसार मंगळाचे संक्रमण मीन राशीसाठी अनुकूल परिणाम देणार आहे. या राशीच्या लोकांची या काळात प्रगती होईल. जर तुम्ही परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहत असाल तर तुम्हाला त्यात यश मिळेल. इतकेच नाही तर अनेक दिवसांपासून कोर्टात अडकलेले खटले जिंकतील.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment