Eknath Khadse : खडसेंचा भाजप प्रवेशाचा मार्ग मोकळा… प्रवेशाचा मुहूर्त कधी ?

Eknath Khadse : एकनाथ खडसे यांनी आपण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं सांगितलं, पण त्यांचा अद्यापही प्रवेश झालेला नाही, त्यामुळे खडसेंच्या भाजप प्रवेशाला मुहूर्त का मिळत नाहीये ? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. अशातच काल २० रोजी रात्री केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्यासह त्यांनी अमित शाह यांची भेट घेतली. त्यामुळे त्यांच्या पक्षप्रवेशावर शिक्कामोर्तब झाल्याचे बोलले जात आहे.

भाजपमधून राष्ट्रवादीत गेलेले एकनाथ खडसे यांनी २ एप्रिल २०२४ रोजी दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी आपण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा करत, राष्ट्रवादी काँग्रेसला सोडशिट्टी दिली होती. त्यामुळे खडसे यांचा भाजप प्रवेश कधी होणार ? यांकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, लोकसभा निवडणुकींमुळे त्यांचा पक्ष प्रवेश लांबणीवर गेला. आता लोकसभा निवडणुका संपल्या आहे. त्यामुळे एकनाथ खडसे यांचा पक्ष प्रवेश कधी होणार अशा चर्चा रंगल्या आहे.

दरम्यान,  केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्यासह त्यांनी काल २० रोजी रात्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यामुळे त्यांच्या पक्षप्रवेशावर शिक्कामोर्तब झाल्याचे बोलले जात आहे.