---Advertisement---
बोदवड : दोन दिवसाअगोदर शिरसाळा मारुती येथील सिद्धेश्वर हनुमान जागृत देवस्थानाची स्वागत कमान एका डंपरने पाडली होती. त्याची तक्रार देण्यासाठी शिवसेना पदाधिकारी बोदवड पोलीस ठाण्यात गेले असता पोलीस निरीक्षक अरविंद भोळे यांनी गुन्हा दाखल करुन घेण्यास टाळाटाळ करून गुन्हा दाखल केला नाही. याच्या निषेधार्थ पोलीस निरीक्षक अरविंद भोळे यांच्यावर तात्काळ कारवाई करावी या मागणीसाठी मलकापूर चौफुलीवर शिवसेनेचे शेकडो पदाधिकारी यांनी दोन तास ठिय्या आंदोलन केले. यानंतर तहसीलदार अनिल रायपुरे व मुक्ताईनगरचे डीवायएसपी यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले की, सिद्धेश्वर हनुमान मंदिर जागृत देवस्थान आहे. या देवस्थानाकडे दिशादर्शक असणारे इंदूर छत्रपती संभाजी नगर महामार्गावरील स्वागत कामांचे एका ठेकेदाराच्या बेजबाबदारपणामुळे भरधावा वाहनाने कमान जमीन दोस्त करण्यात केली. यामुळे भाविकांच्या धार्मिक भावना दुखावल्या असून नागरिकांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण होते. बोदवड पोलीस स्टेशनने संबंधित वाहन ताब्यात घेऊन संबंधित वाहनाची कुठलीही कागदपत्राची तपासणी केली नाही. दुसऱ्या दिवशी वाहन सोडून देण्यात आलेत्यामुळे पोलीस निरीक्षक अरविंद भोळे यांनी ठेकेदाराशी आर्थिक हितसंबंध जोपासत वाहन मालकावर कोणत्याही प्रकारची कारवाई न करता दुसऱ्या दिवशी वाहन सोडून दिल्याचा आरोप नागरिकांनी केला.

हा प्रकार संताप जनक असून प्रचंड चुकीचा आहे याची दखल वरिष्ठ पातळीवर घेण्यात यावी व तत्काळ बोदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरविंद भोळे यांच्यावर कायदेशीर कार्य करण्यात यावी व वाहन मालकावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा शिवसेनेतर्फे यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. यावेळी नगराध्यक्ष आनंदा पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य उद्धव पाटील, नगरसेवक सईद बागवान, सुनील बोरसे, हर्षल बडगुजर, गोलू बरडिया, मुक्ताईनगर येथील सुनील बोरसे हे उपस्थित होते.
---Advertisement---
दोन तासानंतर तहसीलदार अनिल पुरे डीवायएसपी ढवळेयांना निवेदन देऊन आंदोलन मागे घेण्यात आले. तर डीवायएसपी यांच्या असे म्हणणे आहे आरटीओ ऑफिस द्वारा गाडीची तपासणी करून गाडी मालकावरती 26 हजार रुपयांचा दंड आकारण्यात आले असल्याचे सांगितले. संबंधित ठेकेदार ती कमान नव्याने बांधून देणार असल्याचे सांगितले. तसेच ज्या संस्थेने ही कमान उभारली त्या संस्थेची कोणती तक्रार आमच्याकडे नव्हती व जागा मालकाचा सुद्धा काहीही म्हणणं नसल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचे सांगितले.